IND vs NZ 2nd Test : दुसऱ्या टेस्टसाठी पुण्यात पोहोचली टीम इंडिया, Video मध्ये पाहा खेळाडूंची धमाल…

IND vs NZ Pune Test : न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा 8 विकेटने पराभव केला. अशाप्रकारे किवी संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. आता उभय संघांमधील दुसरी कसोटी 24 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबरदरम्यान खेळवली जाणार आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. यासाठी भारतीय संघ सोमवारी रात्री पुण्यात पोहोचला आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय संघाचे खेळाडू बंगळुरूहून पुण्यात कसे पोहोचले हे दाखवण्यात आले आहे.
Sound 🔛
Travel Day ✅#TeamIndia has reached Pune 👍#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/5CFAoK0dcJ
— BCCI (@BCCI) October 21, 2024
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव…
भारतीय संघाला पहिल्या कसोटीत 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा डाव अवघ्या 46 धावांवर गारद झाला. याला प्रत्युत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या. अशाप्रकारे न्यूझीलंडला पहिल्या डावाच्या आधारे 356 धावांची आघाडी मिळाली.
दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जोरदार पलटवार केला, पण पराभव टाळता आला नाही. सर्फराज खानने शतक झळकावले. तर ऋषभ पंत 99 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. विराट कोहलीने 70 धावांचे योगदान दिले. भारतीय कर्णधार रोहित शर्माने 52 धावांची उपयुक्त खेळी केली. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 106 धावांचे लक्ष्य होते. न्यूझीलंडने अवघ्या 2 गडी राखून ते लक्ष्य गाठले.





