Sharad Pawar Ajit Pawar Reunion : दोन्ही ‘राष्ट्रवादी’ पुन्हा एकत्र; थेट भाजपाला देणार टक्कर
Sharad Pawar Ajit Pawar Reunion राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही गट आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पुन्हा संयुक्तपणे मैदानात उतरणार.

Sharad Pawar Ajit Pawar Reunion – कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेले राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) हे दोन्ही गट आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी पुन्हा संयुक्तपणे मैदानात उतरणार आहेत.
चंदगडसह गडहिंग्लज आणि आजरा या तीन तालुक्यांत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र लढणार असल्याने या भागात मुख्य सामना भाजपशी होणार आहे.
नगरपालिका निवडणुकांच्या वेळी कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने बहुतांश ठिकाणी घटक पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या. चंदगडमध्ये मात्र वेगळे समीकरण तयार झाले.येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील आणि राष्ट्रवादी (शरद पवार) नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी एकत्रित प्रयत्न केले, तरी भाजप समर्थित आमदार शिवाजीराव पाटील यांनी पालिकेवर वर्चस्व मिळवले.

Ajit Pawar Sharad Pawar reunion
आता महिनाभरानंतर हेच राष्ट्रवादी समीकरण पुन्हा सक्रिय झाले असून त्याची व्याप्ती गडहिंग्लज व आजरा तालुक्यांपर्यंत वाढली आहे. भाजप ला रामराम ठोकत संग्रामसिंह कुपेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने ही आघाडी अधिक मजबूत झाल्याचे मानले जाते.
दरम्यान, भाजपकडूनही हालचाली वेगात आहेत. काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील भाजपच्या वाटेवर असून, त्यामुळे शिवाजीराव पाटील, अप्पी पाटील आणि मानसिंग खराटे यांच्या त्रिकुटाला बळ मिळण्याची शक्यता आहे.याशिवाय शिंदेसेना, ठाकरेसेना आणि काँग्रेस यांची तिसरी आघाडीही मैदानात असल्याने कोल्हापूरच्या दक्षिण भागात तिरंगी आणि चुरशीच्या लढतीचे चित्र तयार झाले आहे.





