Eknath Shinde : बाळासाहेबांचे विचार गोठवले आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Eknath Shinde : शिवसेना पक्ष नाव आणि 'धनुष्यबाण' चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात पार पडणाऱ्या महत्त्वाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले.

Eknath Shinde : २०१९ मध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार गोठवले, हिंदुत्व गोठवले, महाराष्ट्रातील जनतेचे बहुमत गोठवले आणि बाळासाहेबांची घटना देखील गोठवली. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करत आहेत. (Eknath Shinde)
बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरु आहे, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. (Eknath Shinde)
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Eknath Shinde)
सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यघटना, पक्षाची घटना, निवडणूक आयोगाचे अधिकार या सगळ्या बाबी आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरु झाला की त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिली जातील, असे शिंदे म्हणाले. (Eknath Shinde)
दिल्लीत शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून त्यात संघटनात्मक चर्चा होईल, असे ते म्हणाले. मनसे वादावार बोलताना शिंदे म्हणाले की, शिष्टाचाराप्रमाणे सरकारी कार्यालयात राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे फोटो लावले जातात,त्यात विरोध करण्यात काहीच अर्थ नाही. (Eknath Shinde)
मराठा समाजाबाबत सरकार सकारात्मक
मराठा समाजाला १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आयोगाची स्थापना, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्ज अशा अनेक योजना मुख्यमंत्री असताना घेतल्या, आताही इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका आहे. (Eknath Shinde)
जे कायदेशीर आणि न्याय्य आहे ते देण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे पाटील यांना केले. (Eknath Shinde)
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधीच शिंदेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
Eknath Shinde : महायुती सरकार संकटातील बळीराजाच्या पाठीशी : एकनाथ शिंदे






