Political News : माजी मुख्यमंत्र्यांच्या भाचीचा खोलीत आढळला मृतदेह; राज्यात मोठी खळबळ
Political News : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे.

Political News : तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कुटुंबीयांशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या भाची वृष्टी मुखर्जी (वय 28) यांचा मृतदेह बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट परिसरातील त्यांच्या घरात आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Political News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामपूरहाटमधील कुसुंबा गावातील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत वृष्टी मुखर्जी यांचा मृतदेह आढळला. प्राथमिक माहितीनुसार त्या लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. (Political News)
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाचा अहवाल आणि इतर तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (Political News)
ममता बॅनर्जींच्या नातेवाईकांच्या कुटुंबातील होत्या
वृष्टी मुखर्जी या ममता बॅनर्जी यांचे ममेरे भाऊ निहार मुखर्जी यांच्या कन्या होत्या. निहार मुखर्जी हे यापूर्वी रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष होते. वृष्टी यांच्या कुटुंबाचे मूळ घर रामपूरहाटमधील कुसुंबा गावात आहे. (Political News)
वृष्टी मुखर्जी एका स्थानिक शाळेत ग्रुप-सी कर्मचारी म्हणून कार्यरत होत्या. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, त्या गेल्या काही वर्षांपासून नैराश्याचा सामना करत होत्या आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Political News)
भरती प्रकरणानंतर गेली होती नोकरी
कुटुंबीयांच्या माहितीनुसार, सरकारी अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वृष्टी यांची नोकरी गेली होती. (Political News)
या भरती गैरव्यवहाराच्या तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात OMR शीटमध्ये अनियमितता आढळल्याचे समोर आले होते. तपासादरम्यान वृष्टी मुखर्जी यांच्यासह अनेक उमेदवारांची नावेही समोर आली होती. कथित गैरव्यवहाराचा फायदा झाल्याचा आरोप काही उमेदवारांवर करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या कायदेशीर कारवाईच्या पार्श्वभूमीवर वृष्टी यांची नोकरी गेल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. (Political News)
दोन आठवड्यांपूर्वी ममता बॅनर्जींच्या पक्षातील नेत्याचा मृत्यू
दरम्यान, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रामपूरहाटचे माजी आमदार आशीष बॅनर्जी यांचा मृतदेहही रामपूरहाट येथील पक्ष कार्यालयात आढळला होता. (Political News)
पोलिसांना घटनास्थळावरून एक चिठ्ठीही सापडल्याचे सांगण्यात आले होते. आशीष बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल सरकारमध्ये शालेय शिक्षण आणि कृषी यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. तसेच ते विधानसभेचे उपसभापतीही राहिले होते. (Political News)
वृष्टी मुखर्जी यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Political News)





