शिरोली बुद्रुक येथे वनमहोत्सवांतर्गत “एक पेड मॉं के नाम” उपक्रम उत्साहात साजरा

ओझर: न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथे सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जुन्नर यांच्या सहकार्याने केंद्र शासनाचा वनमहोत्सवांतर्गत “एक पेड मॉं के नाम” उपक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे आयोजन वनपरिक्षेत्र अधिकारी समीर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
यावेळी गावचे सरपंच प्रदीप थोरवे, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सचिन थोरवे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील विधाटे, डॉ. भिवसेन राऊत, वनपाल मनीषा काळे, वनपाल संतोष आगरकर, माजी सैनिक व वनरक्षक रमेश खरमाळे, शिक्षिका शोभा कवडे, कविता ढेरंगे, शैला रेंगडे, सुरेखा बांगर, रेश्मा पवार उपस्थित होते.
सामाजिक वनीकरण परिक्षेत्र, जुन्नर यांच्यामार्फत ४५० वृक्षांची रोपे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली. शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आईसाठी एक झाड लावण्याचा संकल्प केला. राष्ट्रीय हरित सेना व वनराई अंतर्गत इको क्लबचे प्रमुख संतोष देवकुळे यांनी वृक्षारोपणाचे नियोजन केले. स्काऊट गाइड विभागाचे जनार्दन खेडकर, प्रियांका पादिर, रूपाली नलावडे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
या कार्यक्रमात रमेश खरमाळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या पर्यावरण संवर्धन कार्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात” कार्यक्रमात कौतुक केले आहे. खरमाळे आणि मनीषा काळे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण जतन, प्रदूषणाची वाढती समस्या आणि वृक्ष संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम निधन यांनी केले, तर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख रामचंद्र अय्यर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. शालेय पर्यवेक्षक अनघा घोडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.





