ओझर : पुणे जिल्ह्यातील न्यू इंग्लिश स्कूल शिरोली बुद्रुक येथील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी गरीब व गरजु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एडियंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आयसीसी देवी गौरव टेक पार्क या कंपनीच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले . या कंपनीकडून सलग तिसऱ्या वर्षी विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत आहे. ग्रंथालयाकरिता काही महत्वाची पुस्तके देखील यांच्या वतीने देण्यात आली आहेत .विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष सहाय्य करणाऱ्या या कंपनीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बाबत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी ही कंपनी सामाजिक हित जोपासून गरीब विद्यार्थ्यांना सहाय्य करून एक चांगले समाजहिताचे काम करत आहे असे सांगितले. तसेच शिरोली बुद्रुक गावचे सरपंच प्रदीप थोरवे यांनी या कार्याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यालयातील मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी काळे साहेब यांचा व सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र अय्यर यांनी कंपनीच्या स्टाफचा सत्कार केला. विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश राऊत यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. विद्यालयातील उपशिक्षक जनार्दन खेडकर यांच्या प्रयत्नातून सलग तीन वर्षे विद्यालयाला शैक्षणिक साहित्य मिळते याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. तुकाराम निधन यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय पाटोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सेवक विकास गुंजारी यांचे देखील साहित्य वाटप करताना मोलाचे सहकार्य लाभले