Sanjeev Arora : कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीची धाड; पंजाबच्या राजकारणात खळबळ
Sanjeev Arora : ईडीने चंदीगड, दिल्ली आणि गुरुग्राममधील संजीव अरोरा व त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित चार ते पाच ठिकाणांवर एकाचवेळी धाडसत्र राबवले.

Sanjeev Arora : पंजाबमधील कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या निवासस्थानी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पहाटे छापा टाकल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
चंदीगडमधील सेक्टर २ परिसरातील अरोरा यांच्या घरावर सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीचे अधिकारी दाखल होते. तब्बल २० वाहनांमधून ईडीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. या छापेमारीदरम्यान सुरक्षेसाठी सुमारे तीन डझन सीआयए आणि एसएफ जवान तैनात करण्यात आले होते. Sanjeev Arora
ईडीने चंदीगड, दिल्ली आणि गुरुग्राममधील संजीव अरोरा व त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित चार ते पाच ठिकाणांवर एकाचवेळी धाडसत्र राबवले. यात मंत्री म्हणून त्यांना देण्यात आलेले अधिकृत निवासस्थान तसेच हॅम्पटन स्काय रियल्टी लिमिटेडच्या कार्यालयाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईनंतर आम आदमी पक्षाने भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आपचे खासदार संजय सिंह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ईडीला भाजपची “सुपारी किलर” संस्था असल्याचा आरोप केला. त्यांनी म्हटले की, पंजाबमधील भगवंत मान सरकारला बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारकडून ईडीचा वापर केला जात आहे. काही दिवस हे नाटक चालेल, खोट्या बातम्या पसरवल्या जातील आणि नंतर ही यंत्रणा दुसऱ्या कामाला लागेल, असा आरोपही त्यांनी केला. Sanjeev Arora

Sanjeev Arora : कॅबिनेट मंत्री संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीची धाड; पंजाबच्या राजकारणात खळबळ
दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही ईडीच्या कारवाईवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भाजपवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप केला. वर्षभरात संजीव अरोरा यांच्या घरी ईडीची ही तिसरी धाड असल्याचे सांगत, “अद्याप त्यांना काहीही सापडलेले नाही,” असे मान यांनी स्पष्ट केले. Sanjeev Arora
भगवंत मान यांनी पुढे म्हटले की, “पंजाब ही गुरूंची आणि शहीद भगतसिंगांची भूमी आहे. औरंगजेबलाही ही भूमी जिंकता आली नाही. त्यामुळे पंजाब कधीही दबावाखाली झुकणार नाही.” त्यांनी ईडी आणि भाजप यांच्यातील कथित संगनमतावरही टीका केली.
हेही वाचा : Nilesh Lanke : खासदार निलेश लंके पुण्यातील रुग्णालयात दाखल; हेल्थ अपडेट समोर





