Nilesh Lanke : अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार नीलेश लंके यांना शुक्रवारी (ता. ८) पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासदार लंके यांना गेल्या काही दिवसांपासून विषाणूजन्य ताप आणि डिहायड्रेशनचा त्रास जाणवत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांना सुरुवातीला अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी पुण्यात हलविण्याचा निर्णय घेतला. (Nilesh Lanke) Nilesh Lanke : खासदार निलेश लंके पुण्यातील रुग्णालयात दाखल; हेल्थ अपडेट समोर यानंतर खासदार लंके यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या संचालक डॉ. प्राची साठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येत असून वैद्यकीय पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. सध्या लंके यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. Nilesh Lanke काही दिवसांपूर्वी १ मे रोजी तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर आयोजित गडसंवर्धन मोहिमेत लंके सहभागी झाले होते. तिथे कडक उन्हात काही तास शारीरिक श्रम केल्याने त्यांची प्रकृती बिघडली. तसेच, सततचे दौरे, जाहीर सभा आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे त्यांना आधीच थकवा जाणवत होता, असेही सांगण्यात येत आहे. (Nilesh Lanke) हेही वाचा: Mother’s Day Special Cake Recipe: मदर्स डे करा खास! आईसाठी घरच्या घरी बनवा हे ५ स्वादिष्ट केक