Ashok Mittal: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा उपनेते अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. या छाप्यामुळे राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. मान यांनी सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये, “भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ईडीने आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी आणि विद्यापीठावर छापा टाकला, ही तर मोदींचीच स्टाईल आहे. आम्ही फांदीवरून गळून पडणारी पाने नाही; वादळांना त्यांच्या मर्यादेत राहायला सांगा.”असे म्हणत त्यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिला आहे. Ashok Mittal: आम आदमी पक्षाच्या हरियाणा युनिटचे नेते अनुराग धांडा यांनी देखील या कारवाईवर प्रतिक्रिया देताना,”भाजपने पंजाब निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ईडी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार आणि उपनेते अशोक मित्तल यांच्या निवासस्थानी छापे टाकत आहे. ” असे म्हटले आहे. Ashok Mittal: भाजपला कुठेही स्वबळावर निवडणुका लढवता येत नाहीत का? भाजप जनतेमध्ये इतका निष्प्रभ झाला आहे का की, त्याची सर्व निवडणूक तयारी ईडी आणि सीबीआयच्या कारवाईनेच सुरू होते? मोदी सरकार हुकूमशहासारखे वागत आहे. पंजाबची जनता आम आदमी पक्षासोबत आहे. ईडी, सीबीआय, भाजपच्या लोकांनो, हे असेच करत राहा.” असेही त्यांनी म्हटले आहे. मित्तल यांच्यावर कोणत्या प्रकरणात छापा टाकला? Ashok Mittal: एक वृत्तसंस्थेनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (फेमा) कथित उल्लंघनासंदर्भात ईडीने आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार आणि उपनेते डॉ. अशोक कुमार मित्तल यांच्याशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापे टाकले आहेत.