पुणे जिल्हा | स्टेअरिंग लाॅक झाल्याने पोळवाडी येथे डंपर उलटला

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – पोळवाडी, खानापूर (ता.भोर) हद्दीत भोरकडून आंबाडेकडे खडी भरून घेवून जात असताना स्टेअरिंग लॉक झाल्याने डंपर उलटला. भोर आंबाडसुदैवानेे या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
मार्गावर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. नशीब बलवत्तर म्हणून चालक तसेच समोरून येणाऱ्या वाहनातील प्रवासी बचावल्याने अनर्थ टळला. भोर आंबाडे रस्त्याचे काम सुरू असून वाहन चालकांना ये-जा करण्यासाठी एक बाजू वाहतुकीसाठी ठेवण्यात आली आहे. या बाजूवर मोठ-मोठे दगड गोटे तसेच खड्डे पडलेले असल्याने वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागते.
रस्त्याच्या कामावरील मालवाहतूक डंपर आंबाडे येथे खडी घेऊन जात असताना चढाला डंपरचे स्टेरिंग लॉक झाल्याने गाडी उजव्या बाजूला उलटला. सुदैवाने डंपरचा चालक बचावला. संबंधित ठेकेदाराने वाहनचलकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच मोठ मोठे दगड गोटे बाजूला करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.





