पुणे जिल्हा | उत्रौली जिल्हा परिषद शाळेची जिल्हा स्तरावर निवड

वीसगाव खोरे, (वार्ताहर) – मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात उत्रौली (ता.भोर) प्राथमिक विभागात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने टप्पा क्रमांक एकपेक्षा अधिक गुण मिळल्याने या शाळा जिल्हास्तरावर मूल्यांकनास पात्र ठरली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मागील वर्षी टप्पा क्रमांक एक मध्ये १०० गुण ठेवण्यात आले होते.
उत्रौलीतील प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. यावर्षी टप्पा क्रमांक दोनमध्ये १५० गुणांकन ठेवले होते. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने १४२ गुण मिळवले. शाळेला मागील वर्षीच्या गुणांकनापेक्षा अधिक गुण मिळवल्याने या शाळा थेट जिल्हास्तरावरील मूल्यांकनास पात्र ठरल्या आहेत.
उत्रौली येथील जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श मॉडेल स्कूल तसेच भोर तालुक्यातील पहिली आयएसओ मानांकन जिल्हा परिषद शाळेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात शाळेची जिल्ह्या स्तरावर निवड झाली आहे.
शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा वाढविणे, शाळांमध्ये शिक्षणाबाबत स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग वाढविणे, आरोग्य, पर्यावरण, कौशल्य विकास,
आर्थिक साक्षरता या विषयांवर उपक्रम राबविण्यासाठी शाळांना प्रोत्साहित करणे.शाळांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा आणि आनंददायी व प्रेरणादायी वातावरण तयार व्हावे.
क्रीडा, आरोग्य, स्वच्छतेचे महत्त्व, राष्ट्रप्रेम, व्यावसायिक शिक्षणाचे महत्त्व तसेच शाळेविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने अभियानाचे आयोजन केले होते.
विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे आयोजन व त्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट, वृक्षांचे रोपण व जोपासना व्हावी, संरक्षक भिंतीची रंगरंगोटी, बोलक्या भिंती, पोषण आहार आदी निकषांवर मुल्यांकन करण्यात आले.
शालेय गुणवत्ता व शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी माजी सभापती शंकरराव शिवतरे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती कै. अनंतराव शेटे, भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती कै. शिवाजीराव शिवतरे,पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे,
माजी मुख्याध्यापक कै. प्रभाकर देशपांडे, कै.रामचंद्र मोरे, कै.लिलावती लोखंडे यांच्या प्रेरणेतून, गटक्षिणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्र प्रमुख अजंना वाडकर मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती,विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेने यश संपादन केल्याचे मुख्याध्यापिका सविता चोरघे यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भरत शिवतरे, उपाध्यक्ष अशोक शिवतरे, उपसरपंच संतोष शिवतरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश शिवतरे, उपाध्यक्ष सारिका शिवतरे,माजी सरपंच भगवान शिवतरे,
माजी सरपंच हनुमंत शिवतरे,उदय कोठावळे, नवनाथ शेटे, शिवाजी शेटे, सचिन शिवतरे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापिका सविता चोरघे, संगिता पापळ विठ्ठल दानवले, अमर उभे, अनिता सुतार, अनिता लोखंडे, वैशाली चिंचकर, अश्विनी पवार, पूजा कुंभार, रुपाली कानडे,ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.
भोर तालुक्यातील क्रमांक आलेल्या शाळा
जिल्हा परिषद गट – जिल्हा स्तरावर निवड
जि प प्राथ शाळा उत्रौली.
जि प प्राथ शाळा देगाव. प्रथम
जि प प्राथ शाळा नांदगाव. द्वितीय
जि प प्राथ शाळा केंजळ. तृतीय
खाजगी शाळा गट – प्रथम
राजा रघुनाथराव विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय भोर, जिल्हा स्तरावर निवड
श्री काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय हातवे. प्रथम
छत्रपती शिवाजी विद्यालय भोर, द्वितीय
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल भोलावडे तृतीय





