Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफीमध्ये अक्षर पटेलचा झंझावत; खास शैलीत पूर्ण केलं अर्धशतक, पाहा Video…

Axar Patel Fifty in Duleep Trophy 2024 : दुलीप ट्रॉफी 2024 आजपासून सुरू झाली आहे. गुरुवार, 5 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या दुलीप ट्रॉफीमध्ये आज दोन सामने खेळले जात आहेत, ज्यामध्ये दुसरा सामना भारत ‘क’ आणि भारत ‘ड’ (India C vs India D) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात अक्षर पटेलकडून उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ‘ड’कडून खेळणाऱ्या अक्षर पटेलने आपले अर्धशतक अतिशय खास पद्धतीने पूर्ण केले, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयद्वारे शेअर करण्यात आला आहे.
अक्षरने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 118 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 86 धावा केल्या. यादरम्यान अक्षरने 3 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले.
Axar Patel on 🔥
Smashes 6⃣4⃣6⃣ off Manav Suthar as he brings up his 50!#DuleepTrophy | @IDFCFIRSTBankhttps://t.co/u0KTJISm6b pic.twitter.com/g8lVbi52Vp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
अक्षर 74 चेंडूत 37 धावांवर फलंदाजी करत होता. अक्षरने गोलंदाजीसाठी आलेल्या मानव सुथारला पहिल्याच चेंडूवर षटकार तर पुढच्या चेंडूवर चौकार लगावला. त्यानंतर पुढचा चेंडू लेगबायच्या माध्यमातून चौकारासाठी गेला आणि त्यानंतर अक्षरने पुढच्या चेंडूवर षटकार ठोकून आपलं अर्धशतक पूर्ण केले.
Axar Patel on 🔥
Smashes 6⃣4⃣6⃣ off Manav Suthar as he brings up his 50!#DuleepTrophy | @IDFCFIRSTBankhttps://t.co/u0KTJISm6b pic.twitter.com/g8lVbi52Vp
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 5, 2024
अक्षर वगळता सर्व फलंदाज ठरले फ्लॉप…
अक्षर पटेलने भारत ‘ड’ संघासाठी शानदार खेळी खेळली, तर संघाचे इतर सर्व फलंदाज मात्र सपशेल फ्लॉप होताना दिसले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारत ‘ड’ संघाचा डाव केवळ 164 धावांवर संपुष्टात आला, ज्यामध्ये अक्षर पटेलने 86 धावांचे योगदान दिले.
अक्षरनंतर सरांश जैन आणि श्रीकर भरत यांची संघासाठी सर्वात मोठी खेळी होती. दोन्ही फलंदाजांनी प्रत्येकी 13-13 धावा केल्या. संघाचे एकूण 6 फलंदाज दुहेरी आकडाही पार करू शकले नाहीत, त्यापैकी 3 फलंदाजांनी आपले खातेही उघडता आले नाही.
यादरम्यान भारत ‘क’ संघाकडून विजयकुमार वैश्यने सर्वाधिक 3 बळी घेतले. बाकी अंशुल कंबोज आणि हिमांशू चौहान यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले. याशिवाय मानव सुथार आणि हृतिक शौकीन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले.





