Paris Paralympics 2024 : भारताचा ‘क्लब थ्रो’मध्ये दुहेरी धमाका, धर्मबीरने सुवर्ण तर प्रणवने पटकावलं रौप्यपदक…

Paris Paralympics 2024 (Men’s Club Throw F51) : भारतासाठी पुरुष क्लब थ्रो स्पर्धा खूपच शानदार राहिली. धर्मबीर आणि प्रणव सुरमा यांनी अप्रतिम कामगिरी करत भारताला एकाच स्पर्धेत दोन पदके मिळवून दिली. या दोन पदकांसह भारताच्या पदकांची संख्या आता 24 वर पोहोचली आहे. भारताने आतापर्यंत 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदके जिंकली आहेत.
पुरुषांच्या क्लब थ्रो एफ51 (F51) स्पर्धेच्या अंतिम फेरीत धर्मबीर (Dharambir) याने 34.92 मी. थ्रो करत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले, तर प्रणव सूरमा (Pranav Soorma) याने 34.59 मी. थ्रोसह रौप्यपदक आपल्या नावावर केले. बुधवारी (04 सप्टेंबर) रात्री उशिरा हा सामना झाला. या स्पर्धेत सर्बियाच्या जेल्को दिमित्रीजेविकने 34.18 मीटर थ्रो करत कांस्यपदक पटकावले.
चार फाउल केल्यानंतर मिळाले सुवर्णयश…
धर्मबीरने अंतिम सामन्यात पहिले चार थ्रो फाऊल केले. त्यानंतर पाचव्या थ्रोमध्ये त्याने 34.92 अंतर गाठले आणि हा त्याचा सर्वोत्तम थ्रो होता, ज्यामुळे त्याने सुवर्ण जिंकले. यानंतर धर्मबीरने सहाव्या थ्रोमध्ये 31.59 मीटर अंतर पूर्ण केले. अशाप्रकारे पहिले चार थ्रो फाऊल करूनही धर्मबीरने सुवर्णपदकावर कब्जा केला.
अंतिम फेरीत धर्मबीरचे प्रदर्शन :
पहिला थ्रो- फाउल
दूसरा थ्रो- फाउल
तीसरा थ्रो- फाउल
चौथा थ्रो- फाउल
पाचवा थ्रो- 34.92 मीटर
सहावा थ्रो- 31.59 मीटर
A 1-2 finish For #TeamIndia!🇮🇳🥳#ParaAthletics: Men’s Club Throw F51 Final👇🏻
What an incredible 🤩 day for India🇮🇳 as Dharambir and Pranav Soorma clinch #Gold🥇 and #Silver🥈 with the best throws of 34.92 and 34.59 metres respectively.
This is the first time, India🇮🇳 has won… pic.twitter.com/kQiPWTA4wi
— SAI Media (@Media_SAI) September 4, 2024
प्रणवची पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम कामगिरी…
दुसरीकडे, प्रणव सुरमाने पहिल्याच थ्रोमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यानं पहिला थ्रोमध्ये 34.59 मीटर अंतर पूर्ण केले होते, ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळाले. त्यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 34.19 मी. अंतर नोंदवले तर तिसरा थ्रो फाऊल ठरला. यानंतर त्याने चौथ्या थ्रोमध्ये 34.50, पाचव्या थ्रोमध्ये 33.90 आणि सहाव्या थ्रोमध्ये 33.70 असे अंतर पूर्ण केले.
Paris Paralympics 2024 : भारताच्या हरविंदर सिंगचा तिरंदाजीत ऐतिहासिक ‘सुवर्ण’वेध….
अंतिम फेरीत प्रणव सूरमाचे प्रदर्शन:
पहिला थ्रो- 34.59 मीटर
दूसरा थ्रो- 34.19 मीटर
तीसरा थ्रो- फाउल
चौथा थ्रो- 34.50 मीटर
पाचवा थ्रो- 33.90 मीटर
सहावा थ्रो- 33.70 मीटर
या स्पर्धेत सहभागी होणारा तिसरा भारतीय अमित कुमार पदक जिंकू शकला नाही. तो केवळ 23.96 चा सर्वोत्तम थ्रो करू शकला. या थ्रोसह अमित कुमार या स्पर्धेत दहाव्या स्थानावर राहिला.





