PBKS vs DC : ‘करो या मरो’च्या सामन्यात दिल्लीचा दमदार विजय; अक्षरच्या खेळीने प्लेऑफ्सच्या आशा जिवंत, पंजाबचा सलग चौथा पराभव
PBKS vs DC : दिल्लीच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे कर्णधार अक्षर पटेल, ज्याने कठीण काळात आपल्या बॅटीची जादू दाखवली.

DC vs PBKS Delhi Capitals won by 3 Wickets : आयपीएल २०२६ मधील प्लेऑफ्सच्या दृष्टीने ‘करो या मरो’ अशा परिस्थित असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने अखेर फिनिक्स भरारी घेतली आहे. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात दिल्लीने पंजाब किंग्सचा ३ गड्यांनी पराभव करत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले आहे. २११ धावांचे डोंगरसम विशाल लक्ष्य दिल्लीने १९ व्या षटकातच गाठले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे कर्णधार अक्षर पटेल, ज्याने कठीण काळात आपल्या बॅटीची जादू दाखवली.
पंजाबची वादळी सुरुवात, पण मधल्या फळीत ब्रेक –
पंजाब किंग्सचे दुसरे होम ग्राऊंड असलेल्या धर्मशाला मैदानावर पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर प्रियांश आर्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचून इरादे स्पष्ट केले. पंजाबने अवघ्या २.४ षटकात ५० धावा फलकावर लावल्या होत्या. प्रियांशने २४ चेंडूत अर्धशतक ठोकून पाया रचला, तर कर्णधार श्रेयस अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली.
2⃣ points in the bag ✅
Picture perfect victory at a picturesque venue 🖼️@DelhiCapitals continue to fight in #TATAIPL 2026 💙
Scorecard ▶️ https://t.co/wHhflKIvCR#KhelBindaas | #PBKSvDC pic.twitter.com/Lv8HuWeRhe
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026
मात्र, एका वेळी २२० धावा पार करेल असे वाटणारा पंजाबचा संघ मधल्या षटकांत अडखळला. सूर्यांश शेडगेच्या ८ चेंडूतील २१ धावांच्या जोरावर पंजाबने २० ओव्हर्समध्ये २१० धावा उभारल्या. दिल्लीकडून मिचेल स्टार्क आणि युवा माधव तिवारी यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
अक्षर पटेलने साकारली कप्तानी इनिंग –
Captain masterclass under pressure 🫡
Axar Patel departs after a very important 56(30) 👏
Updates ▶️ https://t.co/wHhflKIvCR#TATAIPL | #KhelBindaas | #PBKSvDC pic.twitter.com/TZSJL8YPJh
— IndianPremierLeague (@IPL) May 11, 2026
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था अत्यंत बिकट झाली होती. पॉवरप्लेमध्ये अवघ्या ३३ धावांत ३ मुख्य फलंदाज तंबूत परतले होते. अर्शदीप सिंग आणि यश ठाकूरने दिल्लीला सुरुवातीलाच धक्के दिले. मात्र, संपूर्ण हंगामात बॅटने फ्लॉप राहिलेल्या अक्षर पटेलने आज कणा दाखवला. गेल्या ८ सामन्यात केवळ ४४ धावा करणाऱ्या अक्षरने आज ३० चेंडूत ५६ धावांची स्फोटक खेळी केली.
त्याने डेव्हिड मिलर आणि अष्टपैलू माधव तिवारी यांच्या साथीने दिल्लीला विजयपथावर नेले. मिलर आणि माधव यांच्या उपयुक्त योगदानामुळे दिल्लीने एक कठीण विजय साकारला. व्हिड मिलरने देखील वादळी साकारली. त्याने २८ चेंडूंत ५१ धावांचे योगदान दिले. या पराभवामुळे सातत्याने विजय मिळवणाऱ्या पंजाबला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर दिल्लीसाठी हा विजय ‘संजीवनी’ ठरला आहे.





