Mamata Banerjee : “भाजपच्या कटामुळे, आमच्या बंधू-भगिनींना नागरिकत्त्व मिळण्यात चालढकल होते…”; ममता बॅनर्जी यांचा गंभीर आरोप
केंद्रातील भाजप सरकारच्या कटामुळे, आमच्या मतुआ बंधू आणि भगिनींना नागरिकत्त्व मिळण्यात चालढकल होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.

Mamata Banerjee – भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्र सरकार नागरिकत्व देण्याच्या नावाखाली मतुआ समुदायाच्या सदस्यांना अनिश्चितता आणि गोंधळात ढकलत आहे. मतुआ समुदायाच्या नेत्या बिनापाणी देवी, ज्या बरोमा म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण करत असताना केंद्र सरकार दीर्घकाळापासून देशाचे नागरिक असलेल्या लोकांच्या ओळखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, असे प्रतिपादन तृणमूल काॅंग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. Mamata Banerjee
एका पोस्टमध्ये ममता बॅनर्जी म्हणाल्या की, केंद्रातील भाजप सरकारच्या कटामुळे, आमच्या मतुआ बंधू आणि भगिनींना नागरिकत्त्व मिळण्यात चालढकल होत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे.
मतदार यादीच्या सघन पुनरावृत्तीद्वारे अशा मतदारांना जाणीवपूर्वक मतदार यादीतून वगळले जात आहे. पिढ्यानपिढ्या या देशाचे नागरिक राहिलेले, ज्यांच्या मतांनी सरकार निवडले जाते, त्यांना आता पुन्हा नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. (Mamata Banerjee)
बॅनर्जी म्हणाल्या की, आमचे सरकार मतुआ समुदायाच्या हक्कांना कमकुवत करणाऱ्या कोणत्याही कृतीला विरोध करत राहील. हा अन्याय सहन केला जाणार नाही. माझ्या मतुआ नागरिकांचे आणि बंगालच्या लोकांचे हक्क हिसकावून घेण्याच्या प्रयत्नांविरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील. आम्ही बंगालच्या लोकांचे कोणतेही नुकसान होऊ देणार नाही.
माझे या समाजातील बिनापाणी देवींशी आध्यात्मिक संबंध होते. त्यांच्याकडूनच मला मातृत्वाचे प्रेम मिळाले. बरोमा बिनापाणी देवी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, मी श्रद्धांजली अर्पण करते. हरिचंद ठाकूर आणि गुरुचंद ठाकूर यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करून, मतुआ महासंघ बंगालच्या सामाजिक सुधारणा आणि पुनर्जागरणाचा अविभाज्य भाग राहिला आहे.
बरोमा यांनी आयुष्यभर या आदर्शांचे पालनपोषण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली, मतुआ महासंघ सामाजिक समता आणि बंधुत्वाचा आधारस्तंभ म्हणून उदयास आला. आता उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे मतुआ विकास मंडळ आणि हरिचंद-गुरुचंद विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे.
– ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल






