राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

Bar Association Strike | राज्य सरकारच्या मद्यावरील करवाढीच्या निर्णयाविरोधात हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांनी संप पुकारला आहे. हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन आणि इतर संबंधित संघटनांनी आज, 14 जुलै 2025 (सोमवार) रोजी एक दिवसीय राज्यभर बार, परमिट रूम आणि रेस्टॉरंटमधील मद्यसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या बंदमध्ये सुमारे २२,००० हॉटेल्स आणि बार सहभागी होणार आहेत. त्यामुळे राज्यातील ग्राहकांसोबतच महसूल यंत्रणेलाही मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्र अडचणींमध्ये असताना करवाढीचे निर्णय म्हणजे अन्यायकारक आहे. हे आंदोलन आमचा ‘सामूहिक आक्रोश’ असून, सरकारने ही करवाढ मागे घ्यावी आणि रोजगार, आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायसुलभतेचा विचार करावा अशी आमची ठाम मागणी बार चालकांनी केली आहे. Bar Association Strike |
संप पुकारण्याचे कारण काय?
दरम्यान, राज्य सरकारने उत्पादन शुल्कात थेट 60% वाढ केली आहे. यापूर्वी सरकारच्या माध्यमातून 10 टक्के व्हॅट देखील लावण्यात आला होता. आता परवाना शुल्कात देखील थेट 15% ची वाढ करण्यात आली आहे. या सगळ्या विरोधात बार चालकांनी संप पुकारला आहे.
राज्य सरकारने या मुद्द्यावर तत्काळ गांभीर्याने विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा हॉटेल उद्योगातील असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा :
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?





