Iran-Israel war impact : भारतालाही युद्धाची झळ! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील २० टक्के हॉटेल्स बंद
Iran-Israel war impact : गॅसचा हा तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसात 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Iran-Israel war impact : इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचदरम्यान भारतात घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या. आता याचा फटका काही हॉटेल्स देखील बसला आहे.
मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आहार या संघटनेने दिली आहे.
गॅस पुरवठा सुरळीत न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
हा तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसात 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे देशभरात आणि राज्यातही गॅसचा तुटवडा जाणवू लागला आहे.
गॅस तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावर
मुंबईत हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर एलपीजी आणि कमर्शियल गॅसवर अवलंबून असल्याने या तुटवड्याचा थेट परिणाम हॉटेल उद्योगावर होत आहे. Iran-Israel war impact
‘आहार’चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅसचा पुरवठा सुरळीत न झाल्यास हॉटेल इंडस्ट्रीसमोर मोठे संकट ओढवू शकते. Iran-Israel war impact
या समस्येबाबत आहार संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधत आहे. तसेच राज्यातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मंगळवारी संघटनेचे प्रतिनिधी भेट घेऊन, गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करणार आहेत. Iran-Israel war impact
हेही वाचा:
Forest Department NOC : आता वन विभागाची एनओसी मिळवणं होणार कठीण; सरकारने नियम बदलले..पाहा






