शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; ठाकरे गटाची नेमकी मागणी काय?

Shivsena Symbol Dispute | शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर एकनाथ शिंदेंनी दावा केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मुभा दिली. परंतु निवडणूक आयोगाने हा निर्णय मुळात असंवैधानिक आहे, असा दावा शिवसेना ठाकरे गटाने केला. त्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेतली. शिवसेना पक्ष नाव आणि चिन्हावर आज न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे.
दरम्यान, आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाला चिन्ह आणि नाव वापरण्यास मनाई करा. तसेच उद्धव यांनी ठाकरे यांना ‘शिवसेना’ हे नाव, ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि वाघासोबत भगवा ध्वज पुन्हा वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे.
तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात दिलेल्या अंतरिम आदेशाप्रमाणे शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत अंतरिम आदेश द्या, अशी विनंती शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात आली होती.
आतापर्यंत काय घडलं?
- जून 2022 मध्ये शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरुद्ध बंड करत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केले.
- शिंदे यांनी शिवसेनेवर आपला दावा मांडला आणि 2023 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून स्वीकारले. तसेच, शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली.
- उद्धव गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
- सर्वोच्च न्यायालयाने सभापती राहुल नार्वेकर यांना यावर निर्णय घेण्यास सांगितले होते.
- 2024 मध्ये राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून सांगितले. याविरुद्ध ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
- याप्रकरणी न्यायालयाने शिंदेंसह सर्व बंडखोर आमदारांना नोटीस बजावली होती. Shivsena Symbol Dispute |
त्याप्रकरणी शिवसेनेच्या मूळ नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा आयोगाचा निर्णय कायद्याच्या अधिकार कक्षेबाहेरचा आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे. याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात यावर महत्त्वाची सुनावणी होणार असून या खटल्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. Shivsena Symbol Dispute |
हेही वाचा :
डोनाल्ड ट्रम्पचा व्लादिमिर पुतिनवर संताप ; म्हणाले,’रात्रीच्या अंधारात…’





