Drone attack : इराकमधील तेलविहीरींवर ड्रोन हल्ले.! नुकसानीमुळे प्रशासकीय ताण वाढला

Drone attack – इराकमधील उत्तरेकडील अर्धस्वायत्त कुर्दिश प्रदेशातील तेल विरीरींवर आज ड्रोन हल्ले करण्यात आले. अलिकडच्या काळात तेलविरीरींवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे या भागातील अनेक तेलविरीरी यापुर्वीच बंद करणय्त आल्या आहेत.
आज झालेल्या ड्रोन हल्ल्याची कोणत्याही गटाने जबाबदारी स्वीकारलेली नाही. मात्र या ड्रोन हल्ल्यांमुळे इराकमधील मध्यवर्ती सरकार आणि कुर्दिश प्रशासनातील तणाव अधिकच वाढला आहे.
झाखो जिल्ह्यातल्या तेल विहीरीवर दोन ड्रोनचा हल्ला करण्यात आला. यामध्ये या तेलविरीरीचे नुकसान झाले असले तरी कोणीही जखमी झाले नाही, असे कुर्दिश प्रदेशातील दहशतवादविरोधी विभागाने म्हटले आहे.
तेलविहीरीवर ३ स्फोट झाल्यानंतर या तेल विहीरीचे व्यवस्थापन बघणाऱ्या डीएनओ एएसए या नॉर्वेतल्या कंपनीने आपले काम तात्पुरते स्थगित केले आहे.
या तीन स्फोटांपैकी एक तावके येथील छोट्या गोदामावर आणि अन्य दोन पेशकाबिर येथील पृष्ठभाग प्रक्रिया उपकरणांवर झाले होते. या स्फोटांमुळे तेलविहीरीचे झालेले नुकसान तपासले जाते आहे.
आदल्याच दिवशी इराकमधील दोहूक प्रांतात अमेरिकेतल्या कंपनीकडून चालवल्या जात असलेल्या तेल विहीरीवर देखील ड्रोन हल्ला झाला होता. त्यामुळे या तेल विहीरीला आग लागली होती.
या तेल विहीरींवरचे ड्रोन हल्ले कुर्दिस्तान प्रदेशाचे अर्थकारण विस्कळीत करणे आणि उर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याच्या उद्देशाने होत असल्याचे कुर्दिश प्रदेशातील नैसर्गिक संसाधनांच्या मंत्रालयाने म्हटले आहे.
इराक सैन्यदलाच्या थेट नियत्रणाखाली असलेल्या इराणशी संबंधित पॉप्युलर मोबिलाईजेशन फोर्सेस या सशस्त्र गटांकडून हे ड्रोन हल्ले केले जात असल्याचा आरोप कुर्दिश प्रादेशि सरकारने या महिन्याच्या सुरुवातीला केला होता.





