Dr Sirivella Prasad : काँग्रेसमध्ये फेरबदल ! महाराष्ट्र प्रभारीपदी आंध्रचे नेते सिरीवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती
Dr Sirivella Prasad : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरीवेल्ला प्रसाद हे अर्थतज्ञ असून दलित नेते

Dr Sirivella Prasad : काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सहा राज्यांच्या प्रभारींची नियुक्ती जाहीर केली आहे. ज्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी म्हणून आंध्र प्रदेशमधील नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. सिरीवेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याआधी केरळचे रमेश चेन्नीथला महाराष्ट्रात राज्य प्रभारी म्हणून कार्यरत होते. मात्र सध्या ते केरळचे गृहमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे गेले चार महिने महाराष्ट्राचे पद रिक्त होते. त्यामुळे आता सिरीवेल्ला प्रसाद हे रमेश चेन्नीथला यांची जागा घेतील.
कोण आहेत डॉ. प्रसाद ?
डॉ. प्रसाद हे अर्थतज्ञ असून दलित नेते आहेत. तमिळनाडू आणि झारखंड राज्याचे सहप्रभारी म्हणून त्यांनी काम केलेले आहे. २०१९ मध्ये डॉ. प्रसाद यांनी आंध्र प्रदेशमधील ओंगाले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती.
चेन्नीथला हे प्रभारी असताना अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस होते. मात्र आता सचिव असलेले प्रसाद यांना प्रभारीपद दिले आहे. ते उच्चशिक्षित असून काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय समन्वयक राहिले आहेत.
कोणाची कुठे नियुक्ती?
काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेश बघेल यांना आसामचे प्रभारीपद देण्यात आले आहे. सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडे गुजरातचे, तर सरचिटणीस सचिन पायलट यांच्याकडे विधानसभेची निवडणूक होणार असलेल्या पंजाबचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. सुखदेव भगत यांना छत्तीसगढ आणि पी. व्ही. मोहन यांची आंध्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
हेही वाचा:





