Vinod Bansal : काॅंग्रेसचे नेते बौद्धिक दिवाळखोरीने ग्रस्त; विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांची टीका
विनोद बन्सल (Vinod Bansal) यांनी राहुल गांधींविषयी म्हटले आहे की, ते वारंवार स्वतःच्याच विधानांत अडकतात.

Vinod Bansal : विश्व हिंदू परिषदेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बौद्धिक दिवाळखोरीचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे केवळ पुरुषांचे, घटनाबाह्य पंथीय संघटन असल्याचे म्हटले होते. संघामध्ये स्त्रियांना पुरुषांची मालमत्ता मानले जाते.
माझा शिव-शक्तीवर विश्वास आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध लढण्यात मला आनंद मिळतो, असे राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींची ही टिप्पणी रा. स्व. संघाच्या स्थापना दिनानिमित्त आली आहे. या विधानावर प्रतिक्रिया देताना, विनोद बन्सल (Vinod Bansal) यांनी राहुल गांधींविषयी म्हटले आहे की, ते वारंवार स्वतःच्याच विधानांत अडकतात.
राहुलजी, तुम्ही यापूर्वी असाही दावा केला होता की सरकारी अधिकारी, पोलीस कर्मचारी, सुरक्षा दले आणि सरकारमधील लोक तुमच्या पाठीशी आहेत, तरीही तुम्ही अजूनही रस्त्यावरच आहात. ते कसे काय? बन्सल (Vinod Bansal) यांनी इतर धार्मिक समुदायांमधील प्रथांवर गांधींच्या मौनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, काही समुदायांमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने नमाज अदा करण्याची परवानगी नाही.
तिथे महिलांना पुरुषांच्या सोबत नमाज अदा करण्याचीही परवानगी नसते. मग त्यांची ही तथाकथित शिव-शक्ती तेव्हा गप्प का बसते? आजही हिंदू धर्माव्यतिरिक्त अन्य धार्मिक संस्थांमध्ये महिलांना पुरोहित किंवा धर्मगुरू बनण्याची परवानगी दिली जात नाही.
हिंदू समाजात महिलांची पूजा केली जाते, त्यांना आदर दिला जातो आणि त्यांना धार्मिक नेते किंवा महामंडलेश्वर पदावर नियुक्त करून सन्मानित केले जाते, असे बन्सल (Vinod Bansal) यांनी नमूद केले.






