पुणे जिल्हा | डाॅ. महाडिकांचा धन्वंतरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मान

कापूरहोळ, (वार्ताहर) – सारोळा (ता. भोर) येथे वैद्यकीय क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ भोर,खंडाळा आणि पुरदंर तालुक्यातील रूग्णाची मनोभावे अहोरात्र वैद्यकीय सेवा केल्याने डॉ. ज्ञानेश्वर महाडिक यांच्या नीरा व्हॅली मेडिकल असोसिएशनच्या वतीने धन्वतंरी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करून गौरवण्यात आले.
शिरवळ (ता. खंडाळा) येथे नीरा व्हॅली मेडिकल असोसिएशनच्या वतीने घेतलेल्या कार्यक्रमामध्ये जेष्ठ व प्रख्यात डॉ. ज्ञानेश्वर महाडीक यांचा भोरचे प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सुरेश गोरेगावकर व विनय जोगळेकर यांच्या हस्ते “धन्वंतरी जीवन गौरव पुरस्कार” देवून सन्मानित करण्यात आले.
नीरा व्हॅली मेडिकल असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीच्या सदस्यांचा पदभार समारंभ संपन्न झाला. अध्यक्षपदी डॉ. पांडुरंग भरगुडे यांची तर उपाध्यक्षपदी डॉ. संतोष तळेकर यांची निवड करण्यात आली व सत्कार घेण्यात आला. शिरवळ खंडाळा रोटरी क्लबचे अध्यक्ष राहूल तांबे, सुनील धुमाळ, हर्षद अतुलकर, राजेंद्र देशमुख, संतोष निकम, अमोल धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.





