Pune news : श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टचा पोलीस मित्र संघटनेकडून सन्मान; ट्रस्टचे वैद्यकीय क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद !
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा बॉबी करनानी, चैतन्य जगताप आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pune news : पोलीसांना वैद्यकीय सेवा देत असल्याबद्दल पोलीस मित्र संघटनेच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चा सन्मान पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ट्रस्ट च्या जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत चालविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा केंद्रात राजेंद्र कपोते यांच्या हस्ते ट्रस्ट चे व्यवस्थापक प्रशांत गोलाईत, समन्वयक राजेंद्र परदेशी यांना स्मृतिचिन्ह देण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेच्या महिला विभागाच्या अध्यक्षा बॉबी करनानी, चैतन्य जगताप आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वैद्यकीय सेवा केंद्रातील सेवा कार्याची माहिती राजेंद्र परदेशी यांनी कपोते यांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना दिली. पोलीसांना ट्रस्टतर्फे अतिशय निष्ठेने आणि अंतःकरणपूर्वक वैद्यकीय सेवा दिली जाते. हजारो गरजू रुग्णांना या सेवेतून दिलासा मिळालेला आहे. ट्रस्टचे कार्य पाहून मी भारावून गेलो, अशी प्रशंसा राजेंद्र कपोते यांनी केली.
गणेशोत्सव आणि अन्य उपक्रमांसाठी पोलीस मित्र संघटना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ला सहकार्य करेल, असे आश्वासन कपोते यांनी दिले.
रक्त तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, ईसीजी आदी सुविधा एकाच छताखाली या वैद्यकीय सेवा केंद्रात दिल्या जातात, हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे. वाड्या-वस्त्यांवर जावून ट्रस्टतर्फे मदत पुरवली जाते, हे कौतुकास्पद असल्याचे राजेंद्र कपोते यांनी सांगितले.
ट्रस्टच्या वतीने प्रशांत गोलाईत आणि राजेंद्र परदेशी यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेद्र कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना श्रीं ची प्रतिमा आणि महावस्त्र देवून त्यांचा सत्कार केला.





