नागरिक त्रस्त.! पुणे-सातारा रस्त्यावरील अपूर्ण कामांमुळे कापूरहोळ येथे वाहतूक कोंडी
Updated On:

कापूरहोळ : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळ गावाजवळ रस्त्याचे अपूर्ण काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे या भागात दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून, नागरिक, विद्यार्थ्यांपासून ते रुग्णवाहिका सेवांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहनचालक, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रोजच्या प्रवासात अडथळ्यांना सामोरे जात असून अनेक वेळा अपघाताचीही शक्यता निर्माण होते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून आणखी धोके निर्माण होत आहेत.





