Bajrang Punia & Dope Test Controversy : नाडाच्या अधिकाऱ्यानं घेतले कालबाह्य किटने नमुने..! जाणून घ्या, काय आहे नेमकं प्रकरण….

Dope Test Controversy (Bajrang Punia Vs NADA) – ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग याची अंमली पदार्थ सेवनाची चाचणी आता वादात सापडली आहे. राष्ट्रीय अमली पदार्थ-विरोधी पथकाचे (नाडा- नॅशनल एंटीडोपिंग एजन्सी) सदस्य खेळाडूंकडून त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने गोळा करत असतात. १३ डिसेंबर २०२३ रोजी नाडा कार्यालयातून एक नमुना गोळा करणारा अधिकारी बजरंग पुनियाकडे गेला. त्यावेळी या अधिका-याने एक्सपायरी डेट (कालबाह्य किट) उलटलेले किट नेले. त्यामुळे नाडाने या डोप कंट्रोल ऑफिसरची (डीसीओ) हकालपट्टी केली आहे.
चाचणीसाठी नमुने न दिल्याने तात्पुरती बंदी घालण्यात आलेल्या बजरंगने नाडाच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.बजरंगची नमुना देण्याची वेळ सकाळी ८ वाजताची होती. बजरंगने लघवीचे नमुने दिले होते. मात्र रक्ताचे नमुने देणारे किट एक्सपायर झाले होते. ही माहिती बजरंगने सोशल मीडियावर पोस्ट केली आणि नाडावर कालबाह्य किटसह नमुना घेतल्याचा आरोप केला. यानंतर १० मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या चाचणीदरम्यान त्याने डोपचा नमुना दिला नाही. तसेच एक्सपायरी किटबाबत जाब विचारला. यानंतर नाडाने त्याच्यावर तात्पुरती बंदी घातली.
IPL 2024 Final : विजेतेपदाची लढत कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या, किती असेल सर्वात स्वस्त तिकीट…
तात्पुरत्या बंदीच्या नोटिशीला उत्तर देताना बजरंगने या प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी व्हावी अशी आपली इच्छा असल्याचे म्हटले आहे. त्याची सुनावणी पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी होऊ शकते. सुनावणीदरम्यान बजरंग निर्दोषत्व सिद्ध करू शकला नाही तर त्याच्यावर दोन ते चार वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. त्यामुळे पॅरिस स्पर्धेतील त्याचा सहभाग रद्द होऊ शकतो.





