Donald Trump। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दिवसांत सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यावेळी त्यांच्या हाताकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. त्यांच्या हातावर दिसणाऱ्या पट्ट्या आणि मेकअपने झाकलेल्या खुणा यामुळे अमेरिकन राजकारणात एक नवीन वाद गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक प्रसंगी, यामुळे अध्यक्षांच्या आरोग्याबद्दल मीडियाने प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, आता व्हाईट हाऊसने या प्रकरणावर अधिकृत निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी,”ट्रम्प यांच्या हातावरील खुणा कोणत्याही गंभीर वैद्यकीय स्थितीचे लक्षण नाहीत” असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, अध्यक्ष सतत लोकांशी हस्तांदोलन करतात आणि हे त्यांच्या दैनंदिन सार्वजनिक दिनचर्येचा एक भाग आहे. म्हणूनच त्यांच्या हातावर जखमांसारखे डाग दिसतात.” लेविट यांनी असेही स्पष्ट केले की,” ट्रम्प दररोज अॅस्पिरिन घेतात आणि अशा औषधांमुळे शरीरावर किरकोळ दुखापती देखील सहजपणे होऊ शकतात” त्यांनी सांगितले की,”हा मुद्दा नवीन नाही. काही महिन्यांपूर्वी ट्रम्प यांच्या मेकअपखाली त्यांच्या हातावर थोडीशी जखम दिसली होती आणि व्हाईट हाऊसनेही हेच कारण सांगितले. लेविट यांनी स्पष्ट केले की वारंवार होणाऱ्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही आणि अध्यक्षांच्या हातावरील खुणा त्यांच्या व्यस्त सार्वजनिक गोष्टींचे सामान्य परिणाम आहेत”. Donald Trump। दरम्यान, ट्रम्प यांनी त्यांच्या आरोग्याबद्दलच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते पूर्णपणे तंदुरुस्त, सक्रिय आणि मानसिकदृष्ट्या मजबूत आहेत. सोशल मीडियावर एका लांबलचक पोस्टमध्ये ट्रम्प यांनी माध्यमांवर हल्ला चढवला आणि म्हटले आहे की,” त्यांच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे “देशद्रोह” आहे आणि काही पत्रकार देशाचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत.” त्यांनी म्हटले आहे की कोणत्याही राष्ट्रपतींनी त्यांच्यापेक्षा जास्त काम केलेले नाही आणि कोणीही इतके तास काम केलेले नाही. या चर्चेचे एक कारण ट्रम्प यांचे वय आहे, ज्यामुळे ७९ वर्षांचे असताना अनेकदा विरोधी पक्ष आणि मीडिया त्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. मात्र , अध्यक्ष आणि त्यांचे कर्मचारी दोघेही असा दावा करतात की अशा अटकळींना वास्तवात कोणताही आधार नाही. Donald Trump।