Angar Nagar Panchayat | सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुक चांगलीच चर्चेत राहिली. मात्र सोलापूरमधीळ २ नगराध्यक्षपद आणि ६ नगरसेवक पदाच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. यात अनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा देखील समावेश आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. प्रशासकीय कारणास्तव या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये मैंदर्गी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, पंढरपूर या नगरपरिषदेतील नगरसेवक पदाच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. अनगरची निवडणूक स्थगित ज्या ठिकाणी अपील दाखल होती आणि न्यायालयाने 23 तारखेपर्यंत निकाल दिले त्यांना आधीच प्रक्रिया राहिलं. मात्र अनगरचा न्यायालयात निकाल 25 ला झाल्याने तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नवीन कार्यक्रमनुसार प्रक्रिया पार पाडताना आयोगला अनगरमध्ये प्रत्येक पदासाठी केवळ एक अर्ज असल्याचे कळवले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगतर्फे बिनविरोधची घोषणा होईल, असे अनगर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाच्या निवडणूकीचा वाद काय? अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राज्यभर येथील दहशतीची मोठी चर्चा झाली होती. सुरुवातीला अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठीतीन अर्ज दाखल झाले होते. यामध्ये भाजपकडून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उज्वला थिटे आणि अपक्ष सरस्वती शिंदे यांनी अर्ज केला होता. अर्जाच्या छाननीत उज्वला थिटे यांनी नामनिर्देशन पत्रात सूचकाची सही केली नसल्याचा आक्षेप घेण्यात आला. यानंतर चौकशी केली असता उज्वला थिटे यांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती अनगर नगरपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी दिली. यानंतर डमी आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी अर्ज मागे घेतला आणि प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांना अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवडण्यात आले होते. त्यानंतर राजन पाटील यांचे पुत्र बाळराजे पाटील यांनी थेट अजित पवारांना आव्हान देत ‘कोणाचाही नाद करा, पण अनगरांचा नाद करू नका,’ असं म्हटलं होतं. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत राहिले. Angar Nagar Panchayat | हेही वाचा : Swara Bhasker: स्वरा भास्करच्या सासऱ्यांना ब्रेन हॅमरेज; अभिनेत्रीची चाहत्यांना भावूक विनंती