National Championships 2024 : भारताची स्टार जिम्नॅस्टिक्सपटू दीपा करणार पुनरागमन…

नवी दिल्ली – भारताची स्टार जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकर पुढील वर्षी जानेवारीत होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेद्वारे स्पर्धात्मक जिम्नॅस्टिक्समध्ये पुनरागमन करणार आहे. या स्पर्धेद्वारे ती आपली गुणवत्ता व दर्जा आणि तंदुरुस्ती सिद्ध करणार आहे. तसेच या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत पुढील वर्षी पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवण्याचाही तीचा प्रयत्न राहील. या स्पर्धेत तीने सरस कामगिरी केली तर आगामी काळात होत असलेल्या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धासाठी तीची भारतीय पथकातही निवड होणार आहे. त्यामुळे पॅरिसला पात्र होण्याचे तीचे स्वप्नही पूर्ण होउ शकते.
जानेवारी २ ते ४ या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा भुवनेश्वरमध्ये होत आहे. ती २०१६ सालच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ती पात्र ठरली होती. तसेच ऑलिम्पिकमध्ये महिला गटाच्या जिम्नॅस्टिक्समध्ये पात्र ठरणारी दीप भारताची पहिलीच महिला जिम्नॅस्ट खेळाडू ठरली होती. त्यापूर्वी २०१५ साली तीने राष्ट्रीय स्पर्धा खेळली होती मात्र, त्यानंचर ती तब्बल आठ वर्षे खेळापासून दूर होती. तीला चाचणीत पात्र ठकल्यावरही हांगझाऊ येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांपासून दूर ठेवण्यात आले होते.
यानंतर दीपाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हेच दिसत नव्हती. तीच्यावर उत्तेजक द्रव्य सेवनाचे आरोप झाले त्यात ती दोषी असल्याचे समोर आल्यावर तीच्यावर २१ महिन्यांची बंदीही लावली गेली होती. मात्र, आता हा कालावधी संपल्यावर तीने कसून सराव सुरु केला आहे. यंदाच्या राष्ट्रीय स्पर्धेत ती उच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी सज्ज बनली आहे. ज्या कठीण काळातून तीने प्रवास केला तो काळ आता संपला असून पॅरिसची पात्रता मीळवत देशाला या खेळात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचा विश्वास तीने व्यक्त केला आहे.
IPL 2024 : चीनसाठी आयपीएल बंदी कायम; स्पॉन्सरशिपबाबत BCCI चा मोठा निर्णय….
आरोपांबाबत अद्याप संभ्रम…
दीपाने बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याचे तीच्यावर असलेल्या आरोप नमुद करण्यात आले होते. मात्र, त्याचे सेवन तीने कसे केले तसेच त्यावर बंदी असल्याचे तीला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन समितीने (नाडा) कसे लक्षात आणून दिले नाही. २१ महिन्यांच्या बंदीनंतर ती तंदुरुस्त असतानाही तीला आशियाई स्पर्धेतून का वगळले गेले हे प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहेत. त्यामुळे जे आरोप तीच्यावर लावले गेले त्याचा संभ्रमही अद्याप कायम आहे.




