Asian Games : जिम्नॅस्टिक संघातून दीपा बाहेर
Updated On:

नवी दिल्ली :- आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने विविध खेळांच्या संघाची नावे आयोजकांकडे पाठवली आहेत. मात्र, भारताच्या जिम्नॅस्टिक संघाची नावे पाठवताना अव्वल महिला जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्मांकरचे नाव वगळले आहे.
अर्थात, यावर दीपाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नसून आपण सराव करतच राहणार आहोत. नाव का पाठवले गेले नाही हे मला माहिती नाही. मला केवळ सांगण्यात आले की माझी दोन वर्षांपूर्वीच्या कामगिरीची आता दखल घेता येणार नाही.
सध्याची कामगिरी कशी आहे त्यावर सर्व अवलंबून राहणार आहे. मात्र, सध्या तरी दीपाच्या जागी प्रगती या नवोदित खेळाडूची निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून दीपा सातत्याने दुखापतींचा सामना करत आहे तसेच डोपिंगमध्ये दोषी ठरल्यामुळे तिच्यावर काही काळाची बंदीही लावण्यात आली होती.





