मुंबई – बीसीसीआयकडून पुढील मोसमासाठी आयपीएल स्पर्धेच्या मुख्य प्रायोजकाचा शोध सुरु आहे. त्यासाठी निविदा प्रक्रीयाही सुरु करण्यात आली असून इच्छूक कंपन्यांनी अर्ज सादर केल्यावर सर्वात जास्त रक्कम जी कंपनी देइल त्याच्याकडेच हे हक्क दिले जातील.
मात्र, या प्रक्रीयेत चीनच्या काही उद्योजकांनी तसेच मोठ्या कंपन्यांनीही इच्छूक असल्याचे वर्तवले होते. मात्र, यंदाही बीसीसीआयने चीनबाबतची बंदी कायम राखली आहे. त्यांच्या कोणत्याही कंपनीला या निविदा प्रक्रीयेत सहभागी होत येणार नसून त्यांचे ज्या अन्य देशाचा कंपनीशी सहकार्य असेल त्या कंपन्यांनाही या प्रक्रीयेपासून दूर ठेवले जाणार आहे.
Cricket : कोहलीची ‘विराट’ कामगिरी! ‘असा’ विक्रम करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज…
२०२० साली दोन्ही देशांत राजकीय तणाव निर्माण झाला तेव्हा व्हीवो ही चीनची आयपीएल स्पर्धेची प्रायोजक कंपनी होती. त्यांच्याशी असलेला करार त्याचवेळी संपूष्टात आला व मुख्य प्रायोजक म्हणून टाटा समुहाशी करार झाला. आता ही मुदत संपली असून नव्याने निविदा प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.