\n

दीपाने (Dipa Karmakar) निवृत्तीचे कारणही सांगितले आहे. आता तिची शारीरिक स्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही, असे तिनं पोस्टमध्ये म्हटले आहे. माझा शेवटचा विजय, आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंद हा एक माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता, कारण तेव्हा मला वाटले की, मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन, परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे, परंतु हृदय सहमत होण्यास तयार नसते.”

\n

नव्या इनिंगसाठी दिला संदेश 

\n

दीपा कर्माकरनेही या पोस्टमध्ये तिच्या नव्या इनिंगचे संकेत दिले आहेत. तिने लिहिले, “मी जरी निवृत्त होत असले तरी जिम्नॅस्केट्सशी माझा संबंध कधीही तुटणार नाही. माझी इच्छा आहे की मी खेळाला काहीतरी परत देऊ शकेन. कदाचित मार्गदर्शक,प्रशिक्षक किंवा माझ्यासारख्या इतर मुलींना पाठिंबा देऊन.”

\n

मी माझे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी सर आणि सोमा मॅडम यांचे आभार मानू इच्छिते, ज्यांनी मला गेली 25 वर्षे मार्गदर्शन केले आणि माझी सर्वात मोठी ताकद बनले. मला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी त्रिपुरा सरकार, जिम्नॅस्टिक फेडरेशन, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया, गोस्पोर्ट्स फाउंडेशन आणि मेराकी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट यांचे आभार मानू इच्छिते. आणि शेवटी, माझ्या कुटुंबासाठी, जे चांगल्या आणि वाईट काळात नेहमीच माझ्यासोबत राहिले.”

\n

ISSF World Jr. Shooting C’ship 2024 : भारतीय संघानं 50 मी. पिस्तूल स्पर्धेत साधला सुवर्णवेध, पदकतालिकेतही मारली बाजी….

\n

\n

दिपा कर्माकरची कामगिरी….

\n

दीपा कर्माकरने (Dipa Karmakar) जिम्नॅस्टिक्स या खेळात वर्ल्डकपमध्ये दोन पदके जिंकली आहेत. तिने 2018 मध्ये मर्सिनमध्ये व्हॉल्टवर सुवर्णपदक जिंकले. 2018 मध्ये, तिने कॉटबसमध्ये व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकले. 2014 च्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही तिने व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकले होते. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तिने दोन पदके जिंकली आहेत. 2024 ताश्कंदमध्ये व्हॉल्टमध्ये सुवर्ण आणि 2015 मध्ये हिरोशिमा येथे झालेल्या चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

\n

ऑलिम्पिकमध्ये रचला होता इतिहास…. 

\n

साल 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला केवळ दोनच पदके मिळाली असली तरी या खेळांमध्ये भारताला एक नवा स्टार मिळाला. पहिल्यांदाच जिम्नॅस्टिक्स या खेळात देशाला भारतीयाकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. दीपा कर्माकर देशासाठी पदक आणू शकली नाही पण ती घराघरात लोकप्रिय झाली होती.

\n

दीपा कर्माकरच्या (Dipa Karmakar) कारकिर्दीतील एक संस्मरणीय क्षण म्हणजे जेव्हा तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्या चमकदार कामगिरीसह अंतिम व्हॉल्ट स्पर्धेसाठी पात्रता मिळवली होती आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती. मात्र, या स्पर्धेत तिला पदक जिंकता आले नसले तरी तिने चौथे स्थान पटकावत भारतासाठी इतिहास रचला होता.

\n

Shanghai Masters 2024 : सिनर,अल्काराज अन् मेदवेदेवची आगेकूच कायम….

\n

\n

मिळाले आहेत अनेक सन्मान…

\n

दिपा कर्माकरला तिच्या उत्कृष्ट कारकिर्दीत अनेक प्रतिष्ठित पुरस्कार आणि सन्मानांनी सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार आणि देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार यांचा समावेश आहे. याशिवाय फोर्ब्सच्या 30 अंडर 30 सुपर अचिव्हर्सच्या यादीत तिचा समावेश करण्यात आला होता.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Dipa Karmakar Retirement : जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं घेतली तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/deepa.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/deepa.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics#webpage","name":"Dipa Karmakar Retirement : जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं घेतली तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना…","url":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/deepa.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/olympian-dipa-karmakar-announces-her-retirement-from-gymnastics","name":"Dipa Karmakar Retirement : जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं घेतली तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना…"}}]}}}

Dipa Karmakar Retirement : जिम्नॅस्ट दीपा कर्माकरनं घेतली तडकाफडकी निवृत्ती, पोस्ट शेअर करत व्यक्त केल्या भावना…