Dhangar Samaj Movement: पंढरपुरात धनगर समाजाचा एल्गार; तहसील कार्यालयासमोर ढोल वाजवत आंदोलन
Dhangar Samaj Movement: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता पंढरपुरात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Dhangar Samaj Movement: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच आता पंढरपुरात धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, तसेच आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत सरकारने धनगर समाजाच्या बाजूने ठामपणे भूमिका घ्यावी, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. (Dhangar Samaj Movement)
या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गजी ढोल वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि सरकारने न्यायालयीन प्रक्रियेत समाजाच्या मागणीची प्रभावीपणे बाजू मांडावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. (Dhangar Samaj Movement)
आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाकडून राज्यभरात आंदोलनाची भूमिका घेतली जात असताना पंढरपुरातील या आंदोलनामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. (Dhangar Samaj Movement)






