IPL 2024 (MI vs DC Match 20) : दिल्लीचा गोलंदाजीचा निर्णय..! मुंबईत सूर्याची एन्ट्री, अशी आहे दोन्ही संघाची Playing 11

IPL Live Cricket Score, MI vs DC, Indian Premier League 2024 : आज IPL 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत 10 व्या तर दिल्लीचा संघ दोन गुणासह 9 व्या स्थानावर आहे.
तत्पूर्वी, नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सच्या बाजूनं लागला आहे. मुंबईविरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रसिक दार सलामच्या जागी ललित यादवने प्लेईंग-11 मध्ये प्रवेश केला आहे आणि दुखापतग्रस्त मिचेल मार्शच्या जागी जे रिचर्डसनने प्लेईंग-11 मध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत टीम डेव्हिड, जेराल्ड कोट्स, मोहम्मद नबी आणि रोमारिया शेफर्ड हे चार परदेशी खेळाडू आहेत. सूर्यकुमार यादव संघात परतला आहेत. नमन धीरच्या जागी तो संघात आला आहे. त्याचवेळी नबीचा प्लेइंग-11 मध्ये डेवाल्ड ब्रेविस आणि शेफर्डच्या जागी मफाकाचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीकडे डेव्हिड वॉर्नर, ट्रिस्टन स्टब्स, जे रिचर्डसन आणि ॲनरिक नॉर्टजे असे चार परदेशी खेळाडू आहेत.
🚨 Toss Update 🚨@DelhiCapitals win the toss & elect to field against @mipaltan
Follow the Match ▶ https://t.co/Ou3aGjoDih #TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/2PeWdOVdeR
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
MI vs DC : दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे….
दिल्ली कॅपिटल्स : डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा, खलील अहमद.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह.
दरम्यान, आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स 33 वेळा आमनेसामने आले आहेत. दरम्यान, एमआयने 18 वेळा विजय मिळवला आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत. उभय संघांमधील सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या मुंबई इंडियन्सने 218 धावांची केली होती. तर, दिल्ली कॅपिटल्सने एमआयविरुद्ध सर्वाधिक 213 धावा केल्या आहेत.





