IPL 2025 : दिल्लीला मोठा धक्का! आता ‘हा’ खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भारतात येणार नाही

DC Player Mitchell Starc IPL 2025 Participation in Doubt : आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होण्याची तयारी सुरू झाली आहे. १६ मे पासून ही स्पर्धा पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. पण या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूंबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, आता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये परतणे थोडे कठीण वाटत आहे. जोश हेझलवूडबद्दल एक अपडेट आहे की तो आयपीएलमध्ये परतू शकणार नाही. दरम्यान, मिचेल स्टार्कबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
मिचेल स्टार्कचे पुनरागमन कठीण –
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघातील अनेक सदस्य आयपीएलच्या भविष्याबद्दल चिंतेत आहेत. तो नुकताच भारतातून ऑस्ट्रेलियाला परतला आहे. खेळाडूंच्या चिंतेचे कारण म्हणजे भारतातील वाढता तणाव आणि आयपीएलच्या वेळापत्रकात होणारा व्यत्यय. मिचेल स्टार्क आणि त्याची पत्नी एलिसा हिली रविवारी सिडनीला पोहोचले. मिचेल स्टार्कने माध्यमांशी संवाद साधला नाही. पण, त्याच्या मॅनेजरने ऑस्ट्रेलियाच्या नाइन न्यूजला सांगितले की जर आयपीएल पुन्हा सुरू झाली तर स्टार्क कदाचित त्यात भाग घेणार नाही.
Never seen Mitchell Starc look that depressed ,he even refused to talk to the media.🤯
Australian media are claiming he’s not going to back India.pic.twitter.com/Qc46qTsMiX
— junaiz (@dhillow_) May 11, 2025
खेळाडू स्वतः निर्णय घेतील –
आयपीएल २०२५ पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) त्यांच्या खेळाडूंच्या निर्णयाचे समर्थन करते. सीएने सांगितले की खेळाडू स्वतःहून निर्णय घेऊ शकतात की त्यांना परतायचे आहे की नाही. खेळाडूंच्या या निर्णयाचा आयपीएलमधील त्यांच्या निवडीवर किंवा बीसीसीआयशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही बोर्डाने म्हटले आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स सघांची चिंता वाढली आहे. कारण स्टार्क त्यांचा आघाडीचा गोलंदाज आहे. त्याने या हंगामात १४ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – IPL 2025 पुन्हा सुरु होण्यापूर्वी आरसीबीची वाढली डोकेदुखी, नेमकं कारण काय? जाणून घ्या
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेड सारख्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी इंग्लंडला जावे लागणार आहे. हा फायनला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लॉर्ड्सवर होईल. यानंतर त्यांना वेस्ट इंडिजमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. आता हे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात परत येतील की नाही हे पाहणे बाकी आहे. कारण स्पर्धेचे वेळापत्रक पुढे जाऊ शकते.





