IPL 2025 पुन्हा सुरु होण्यापूर्वी आरसीबीची वाढली डोकेदुखी, नेमकं कारण काय? जाणून घ्या

IPL 2025 resumes RCB new challenges as Josh Hazelwood : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या लष्करी तणावामुळे आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्याने पुढे ढकलण्यात आली आहे. आता दोन्ही देशांमधील परस्पर संमतीने युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल २०२५ चे उर्वरित सामने पुन्हा सुरू होणार आहेत. तत्पूर्वी आरसीबी संघाची चिंता वाढली आहे. कारण त्यांचा आघाडीचा गोलंदाज जोश हेझलवूड मायदेशी परतला आहे. दरम्यान तो दुखापतग्रस्त असल्याने तो माघारी येण्याची शक्यात कमी आहे.
आरसीबीची वाढली चिंता –
आयपीएल २०२५ स्पर्धा स्थगित झाल्यानंतर अनेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत. अशा परिस्थितीत, आयपीएल पुन्हा सुरू झाल्यास त्यांना परत कसे आणायचे हे बीसीसीआयसमोर सर्वात मोठे आव्हान आहे. जोश हेझलवूड परतणार की नाही याबद्दलही सस्पेन्स आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही. यानंतर, ९ मे रोजी होणाऱ्या सामन्यात त्याच्या खेळण्याबाबत शंका निर्माण झाली. पण ९ मे रोजी आरसीबीचा लखनौ सुपर जायंट्स विरुद्धचा सामना रद्द करण्यात आला.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨
Josh Hazlewood is unlikely to return for RCB in the IPL this month due to a shoulder niggle, but he is expected to be fit for the WTC final. 🤕#IPL2025 #JoshHazlewood #RCB pic.twitter.com/0pkN8AKyMU
— Sportskeeda (@Sportskeeda) May 11, 2025
हेझलवूडचे डब्ल्यूटीसीवर लक्ष –
जोश हेझलवूडला यापूर्वीही साइड स्ट्रेनचा त्रास झाला आहे. दुखापतीमुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळू शकणार नव्हता आणि त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर राहावे लागले. आता ऑस्ट्रेलियन संघाला ११ जूनपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचे आहे. अशा परिस्थितीत, जर आयपीएल लवकर किंवा उशिरा सुरू झाली तर तो या स्पर्धेत खेळणे कठीण होईल.
हेही वाचा – IND vs SL : स्मृती मानधनाचे ऐतिहासिक शतक! ‘हा’ पराक्रम करणारी ठरली जगातील तिसरीच महिला खेळाडू
आयपीएल २०२५ मध्ये लीग टप्प्यातील एकूण १३ सामने शिल्लक –
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया म्हणाले की, बीसीसीआय सर्व भागधारकांशी सल्लामसलत करेल. वेळेचे महत्त्व लक्षात घेता, भारत सरकारची मान्यता घेणे देखील आवश्यक असेल. यानंतर, आयपीएल पुन्हा सुरू करण्याचे नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल. प्लेऑफ सामन्यांव्यतिरिक्त, आयपीएल २०२५ मध्ये लीग टप्प्यातील एकूण १३ सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील रद्द झालेल्या सामन्याचाही समावेश आहे.





