विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; गणेशोत्सवादरम्यान परिसरात घडलेल्या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त
Virar Building Collapse | मंगळवारी रात्री विरार पूर्व येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला आहे. यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी असून 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. अद्यापही शोधकार्य आणि बचावकार्य सुरु आहे.
या दुर्घटनेनंतर अंधेरी येथून एन.डी.आर.एफ.ची अतिरिक्त तुकडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस व महानगरपालिका यंत्रणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू झाले. सुरुवातीला ढिगारा बाजूला करण्यासाठी जेसीबी पोहचू शकत नसल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. मात्र दुपारनंतर इमारती आणि बाजूच्या चाळी खाली करून काही भाग तोडल्याने बचाव कार्याला गती मिळाली. Virar Building Collapse |
अतिधोकादायक इमारत म्हणून घोषित होती
दरम्यान, ही इमारत जुनी असून दहा वर्षापूर्वी महापालिकेने अतिधोकादायक इमारत घोषित केली होती. तरी देखील या इमारतीमध्ये नागरिक राहत होते. अनेक कुटुंब या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. कोसळलेल्या ढिगाऱ्याकडे पाहत नातेवाईक आक्रोश करत होते यामुळे परिसरात गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी दुःखाचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून आले.
या प्रकरणी पालघरच्या जिल्ह्याधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दुपारी दुर्घटनास्थळी भेट दिली बचाव कार्याचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक त्या सूचना वसई विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना दिल्या. Virar Building Collapse |
माय-लेकीचाही मृत्यू
मिळलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत इमारतीत राहणा-या जोयल कुटुंबातील एका वर्षीच्या चिमुरडीचा पहिलाच वाढदिवस होता. त्यानिमित्ताने परिसरातील मित्र परिवार, नातवाईक सर्वजण एकत्रित घरी जमले होते. मात्र अचानक ही दुर्घटना घडली आणि वाढदिवसाच्या दिवशीच चिमुरडीचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचसोबत तिच्या आईचाही मृत्यू झाला आहे.
हेही वाचा :
Pune Crime | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कात्रजमधील ३ गुन्हेगार तडीपार



