चिमूरडीचा पहिलाच वाढदिवस ठरला शेवटचा; विरारमध्ये इमारत कोसळून तिघांचा मृत्यू
Virar Building Collapse | विरारच्या नारंगी फाटा परिसरात असलेली रामू कंम्पाऊडच्या स्वामी समर्थ नगर येथील रमाबाई अपार्टमेंट नावाची ४ मजली इमारतीचा भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यात 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट या ४ मजली इमारतीचा चौथ्या मजल्याचा एक भाग कोसळला. ही इमारत दहा वर्ष जुनी असून महापालिकेने ॲाडीट करण्याची नोटीस दिली होती. पोलिसांनी आतापर्यंत 9 जणांना रेस्क्यू करुन त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. Virar Building Collapse |
घटनास्थळी वसई विरार महापालिकेची अग्निशमन दल, एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शोधकार्य सुरु आहे. सध्या या इमारतीमध्ये 15 ते 20 नागरिक इमारतीच्या मलब्याखाली अडकली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याद्वारे सध्या सर्च ऑपरेशन सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इमारत मध्यभागी आहे आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चाळी असल्याने मदतकार्य पोहोचवण्यास अडथळा निर्माण होत आहे. मोठे जेसीबी तिथे पोहोचू शकत नसल्याने मलबा काढणे अवघड झाले आहे. Virar Building Collapse |
पहिला वाढदिवसच ठरला शेवटचा
या दुर्घटनेत एक वर्षाच्या चिमुरडीचा देखील मृत्यू झाला आहे. उत्कर्षां जोयल असं चिमुकलीचं नाव होतं. काल उत्कर्षा जोईल या चिमुकलीचा पहिला वाढदिवस होता. मात्र तिचा पहिला वाढदिवसच तिच्यासाठी शेवटचा ठरला आहे. तिच्या आईचा ही यात मृत्यू झाला आहे. तर वडील ओमकार जोयल हे सध्या मिसिंग असून ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाती आहे. याशिवाय तिच्या वाढदिवसानिमित्त घरी आलेले सात ते आठ नातेवाईक देखील ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा :





