शिक्षिकेच्या घराला आग अन् पेपर जळून खाक; बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

Virar News | एका शिक्षिकेच्या घराला आग लागून त्यात बारावी बोर्डाच्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. ही घटना १० मार्च रोजी विरार पश्चिमेच्या बोलींज नानभाट रोड येथील गंगुबाई अपार्टमेंटमध्ये घडली. या घटनेमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येणार का? तसेच असे पेपर घरी आणता येतात का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नेमकं काय घडलं?
बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंगसाठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले होते. Virar News |
त्यावेळी शिक्षिकेचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर लागले आहे. Virar News |
हेही वाचा:



