Arun Jaitley Stadium : दिल्ली स्टेडियम बॉम्बने उडवण्याची धमकी, डीडीसीएला धमकीचा ईमेल

DDCA receives bomb threat to blow up Arun Jaitley Stadium : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन (डीडीसीए) ला शुक्रवारी सकाळी अरुण जेटली स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा एक निनावी ईमेल आला आहे. या धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, त्यांचे संपूर्ण भारतात पाकिस्तानशी निष्ठावंत स्लीपर सेल आहेत आणि त्यांना ऑपरेशन सिंदूरसाठी सक्रिय केले जाईल. राष्ट्रीय राजधानीतील हे स्टेडियम दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे होम ग्राउंड आहे.
बॉम्ब हल्ल्याबरोबरच स्लीपर सेलही सक्रिय करण्याची धमकी –
आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित करण्यापूर्वी ११ मे रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल २०२५ सामना येथे होणार होता. डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आणि सांगितले की त्यांनी दिल्ली पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे.
The Arun Jaitley Stadium received a bomb threat via email on Friday morning, and a police complaint has been registered, a top DDCA official told IANS. “There will be a bomb blast in your stadium. We have a committed Pakistan sleeper cell active in India. The blast will be our… pic.twitter.com/vkOgUEY5DT
— IANS (@ians_india) May 9, 2025
डीडीसीएचे वरिष्ठ अधिकारी काय म्हणाले?
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना डीडीसीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “हो, आम्हाला आज सकाळी एक धमकीचा ईमेल मिळाला आणि तो दिल्ली पोलिसांना पाठवला आहे. त्यांनी आधीच कारवाई सुरु केली आहे आणि काही काळापूर्वीच कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील केली आहे.” धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे की त्यांचे संपूर्ण भारतात पाकिस्तानशी निष्ठावंत स्लीपर सेल आहेत आणि त्यांना ऑपरेशन सिंदूरसाठी सक्रिय केले जाईल.
हेही वाचा – IPL 2025 Postponed : बीसीसीआयचा मोठा निर्णय! आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलली
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताच्या लष्करी कारवाईनंतर राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतेचा हवाला देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) एका आठवड्यासाठी अधिकृतपणे स्थगित केली. धर्मशाला येथे पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना हवाई हल्ल्याच्या अलर्टमुळे विस्कळीत झाल्यानंतर एका दिवसानंतर हा निर्णय घेण्यात आला.





