IPL 2025 Postponed : बीसीसीआयचा मोठा निर्णय! आयपीएल स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलली

IPL 2025 Postponed a Week : आयपीएल २०२५ स्पर्धेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली. आता बातमी येत आहे की आयपीएलचा हा हंगाम फक्त एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. परिस्थिती सुधारताच, या स्पर्धेचे सामने सुरू होतील.
TATA IPL 2025 suspended for one week.
More details here 👇👇 | #TATAIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2025
बीसीसीआयने स्पर्धेबाबत आपत्कालीन बैठक बोलावली होती. ज्यामध्ये बोर्डाचे उच्च अधिकारी, सुरक्षा संस्था आणि केंद्रीय मंत्रालयाचे प्रतिनिधी देखील सामील होते. यानंतर स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर लगेचच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, आयपीएल सामने फक्त एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत. आम्ही लवकरच एक नवीन वेळापत्रक जाहीर करू.
आयपीएल २०२५ स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलली –
🚨 𝐎𝐅𝐅𝐈𝐂𝐈𝐀𝐋 𝐒𝐓𝐀𝐓𝐄𝐌𝐄𝐍𝐓 #IPL2025🚨
IPL 2025 has been suspended for one week with immediate effect.
The decision stands in support of our armed forces. Further delays are possible depending on how the situation unfolds.#IPL | #IPLSuspended | #IndiaPakistanWar pic.twitter.com/dqrdIj7Dxf
— Indian Cricket Team (@incricketteam) May 9, 2025
आयपीएल २०२५ स्पर्धा तात्काळ प्रभावाने एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. नवीन वेळापत्रक आणि ठिकाण निश्चित करण्यापूर्वी, सर्व संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने सखोल विचारविनिमय आणि चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – मोठी बातमी ! आयपीएल स्पर्धा स्थगित; भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय
या बैठकीत फ्रँचायझी, खेळाडू, प्रसारक, प्रायोजक आणि चाहते यांच्या चिंता आणि सूचना गांभीर्याने ऐकण्यात आल्या. ते म्हणाले की, बीसीसीआयला भारतीय सैन्याच्या क्षमतेवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास आहे, परंतु बोर्डाने सर्व पक्षांच्या हितासाठी हा निर्णय घेणे योग्य मानले.
हेही वाचा – Virat Anushka Video : विराट-अनुष्काच्या नात्यात कटुता? व्हायरल VIDEO ने चर्चेला उधाण
आयपीएल २०२५ मधील अजून १६ सामने बाकी –
आयपीएल २०२५ मध्ये अजूनही १२ लीग सामने आणि चार नॉकआउट सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये कोलकाता येथे होणाऱ्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. या हंगामात अजून १६ सामने खेळायचे आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी होणार होता पण आता कदाचित त्याचा अंतिम सामना जूनमध्येही होऊ शकतो. आता बीसीसीआय उर्वरित सामने कसे आयोजित करते हे पाहणे बाकी आहे.





