“इंशाअल्लाह! आपण मोठा विजय मिळवू,” ; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांने ओकली पुन्हा गरळ

Khawaja Asif statement। भारत आणि पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदुरपासून आजपर्यंत तणाव आहे. त्यानंतर पाकिस्तानी नेत्यांना भारतासोबत युद्धाची भीती वाटते. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याविषयीची कबूली दिली आहे. त्यांनी,”दोन्ही देशांमधील युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी सांगितले की, “भारतासोबत युद्धाची शक्यता खरी आहे. “मी हे नाकारत नाही. जर परिस्थिती बिकट झाली तर पाकिस्तानला मोठा विजय मिळेल.” असे विधान त्यांनी केले आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केले आहे. त्यांनी यावेळी, “इतिहास साक्षीदार आहे की औरंगजेबाचा काळ वगळता भारत कधीही खऱ्या अर्थाने एकजूट नव्हता,. पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावाने झाली होती. आपण घरात आपापसात वाद घालतो, परंतु जेव्हा भारताशी युद्धाचा प्रश्न येतो तेव्हा आपण सर्वजण एकत्र येतो.”असे म्हणत पुन्हा गरळ ओकली आहे. Khawaja Asif statement।
आसिफ म्हणाले, “मला वाटते की जर, देव करो, अशी परिस्थिती उद्भवली तर ती होण्याची शक्यता आहे. मी ती अजिबात नाकारत नाही. जर ती उद्भवली तर अल्लाह आपल्याला पूर्वीपेक्षा मोठा विजय देईल – इन्शाअल्लाह!”
ख्वाजा आसिफ यांच्या विधानामुळे पाकिस्तान आणि आंतरराष्ट्रीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक सीमा मुद्द्यांवरून तणाव असताना संरक्षणमंत्र्यांचे हे विधान आले आहे.
पाकिस्तानचे अंतर्गत राजकारणही अस्थिर आहे. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावरील कारवाई, आर्थिक संकट आणि लष्कराची वाढती भूमिका यांच्या दरम्यान, ख्वाजा आसिफ यांचे विधान राजकीय पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे. Khawaja Asif statement।





