DC vs RR : दिल्लीच्या बॉलिंग कोचवर BCCI ची मोठी कारवाई! नेमकं प्रकरण काय? पाहा VIDEO

DC vs RR Delhi Capitals coach bowling Munaf Patel fined : आयपीएल २०२५ चा ३२ वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यातील सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राजस्थानचा पराभव केला. पण या रोमांचक सामन्यादरम्यान, दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक मुनाफ पटेल स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि त्यांनी पंचांशी वाद घातला. या प्रकरणात बीसीसीआयने त्यांना शिक्षा केली आहे आणि दंड ठोठावला आहे. त्यांनी मॅच फीमधील २५ टक्के रक्कम कापली जाईल.
मुनाफ पटेलने मान्य केली आपली चूक –
मुनाफ पटेलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये ते चौथ्या पंचाशी जोरदार वाद घालताना दिसतायेत. ही घटना सीमेजवळ घडली. खरंतर, चौथ्या पंचाने दिल्ली संघासाठी मैदानावर संदेश पोहोचवू दिला नाही. दिल्लीचे गोलंदाजी प्रशिक्षक यावर नाराज झाले आणि ते रागाच्या भरात काहीतरी म्हणाले.
बीसीसीआयने केली कारवाई –
Munaf Patel had a heated exchange with the 4th umpire during the #DCvRR match at the Arun Jaitley Stadium, Delhi after the umpire denied sending a player to enter the ground to convey his message.#DCvsRR #IPL2025 pic.twitter.com/hHv0tNAUvd
— Gaurav Chaudhary (@gkctweets) April 16, 2025
यानंतर, बीसीसीआयने आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावला. तसेच एक डिमेरिट पॉइंट दिला आहे. मुनाफ पटेलने आपली चूक मान्य केली आणि शिक्षा स्वीकारली. परंतु, आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात त्यांना कशासाठी शिक्षा झाली आहे, हे स्पष्ट केलेले नाही. पण व्हिडीओ समोर आल्यानंतर ही शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा – DC vs RR : रोमांचक सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राखलं तख्त! राजस्थानचा सलग तिसरा पराभव
दिल्लीने नोंदवला संस्मरणीय विजय –
सामन्याबद्दल बोलायचे, तर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १८८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ २० षटकांत ४ बाद १८८ धावाच करू शकला. यानंतर सामना निकाली काढण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये मिशेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत राजस्थानला फक्त ११ धावांवर रोखले. यानंतर, केएल राहुलने प्रथम चौकार मारला आणि नंतर सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने एक लांब षटकार मारला, ज्यामुळे संघाला एक संस्मरणीय विजय मिळाला.





