पुण्यातील नाना पेठेतील आंदेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर याची गोळ्या घालून हत्या केली होती. या प्रकरणात आयुषची आई कल्याणी कोमकर यांनी समर्थनगर पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना यापूर्वीच अटक केली होती आणि आता या हत्याकांडातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाण याला देखील अटक करण्यात आली आहे. मुनाफ पठाणची भूमिका आयुष कोमकर हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना मुनाफ पठाणचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे पुरावे मिळाले. त्याने आयुषच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. हत्या झाल्यापासून फरार असलेल्या मुनाफला १३ दिवसांनंतर पोलिसांनी अखेर अटक केली. त्यामुळे या प्रकरणातील अटक केलेल्या आरोपींची संख्या आता १३ झाली आहे.मुनाफ पठाणला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याचा या हत्याकांडातील नेमका सहभाग आणि सक्रिय भूमिका याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. आतपर्यंत कोणाकोणाला केली अटक या प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाटोळे, सुजल मिरगू आणि आता मुनाफ पठाण यांचा समावेश आहे. पोलिसांचा तपास अद्याप सुरू असून, या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.