DC vs RR : रोमांचक सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने राखलं तख्त! राजस्थानचा सलग तिसरा पराभव

DC vs RR Delhi Capitals beat Rajasthan Royals in the Super Over : आयपीएल २०२५ च्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करत १८८ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थान संघ २० षटकांत फक्त १८८ धावाच करू शकला. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
सुपर ओव्हरमध्ये मिशेल स्टार्कने शानदार गोलंदाजी करत राजस्थानला फक्त ११ धावांवर रोखले. यानंतर, केएल राहुलने प्रथम चौकार मारला आणि नंतर सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर ट्रिस्टन स्टब्सने एक लांब षटकार मारला, ज्यामुळे संघाला एक संस्मरणीय विजय मिळाला. यासह, दिल्लीने हंगामातील पाचवा विजय नोंदवला, तर राजस्थानला सलग तिसरा आणि एकूण पाचवा पराभव पत्करावा लागला.
Absolutely electric finish today and another thriller at @IPL 2025! @DelhiCapitals and @rajasthanroyals battled hard, taking us to the season’s first super over. Congratulations to the Capitals on this unforgettable win! https://t.co/zs4ZYk2ixT
— Thakur Arun Singh (@ThakurArunS) April 16, 2025
राहुल आणि अभिषेकची ६३ धावांची भागीदारी –
A confident FIFTY under pressure 🔝👏
Nitish Rana’s smashing knock takes #RR closer to the 🎯
They need 31 from 18 deliveries.
Updates ▶ https://t.co/clW1BIQ7PT#TATAIPL | #DCvRR | @rajasthanroyals pic.twitter.com/mlfahdr4rD
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी केली पण पुन्हा एकदा संघाची सुरुवात खराब झाली. यावेळीही सलामीवीर जेक फ्रेझर मॅकगर्क लवकर बाद झाला. पण गेल्या सामन्यातील स्टार करुण नायर यावेळी काहीही करू शकला नाही आणि तो खाते न उघडता ३ चेंडूत धावबाद झाला. यानंतर, केएल राहुल आणि अभिषेक पोरेल यांनी ६३ धावांची भागीदारी केली पण त्याची गती मंदावली. यानंतर, कर्णधार अक्षर पटेल आला आणि त्याने फक्त १४ चेंडूत ३४ धावा करून संघाच्या धावसंख्येला गती दिली. यानंतर, ट्रिस्टन स्टब्स आणि आशुतोष शर्मा यांनी शेवटच्या ३ षटकांत ४२ धावांची भागीदारी केली आणि संघाला ३ विकेटच्या मोबदल्यात १८८ धावांपर्यंत पोहोचवले.
हेही वाचा – DC vs RR : शार्दुल ठाकूर पाठोपाठ संदीप शर्माचा कहर! एकाच षटकात टाकले तब्बल ‘इतके’ वाईड
यशस्वी जैस्वालचे सलग दुसरे अर्धशतक ठरले व्यर्थ –
We are headed to a SUPER OVER! 🤯
Stay tuned folks!
Updates ▶ https://t.co/clW1BIPA0l#TATAIPL | #DCvRR | @DelhiCapitals | @rajasthanroyals pic.twitter.com/x6kwToldK4
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2025
प्रत्युत्तरादाखल, कर्णधार संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल यांच्या सलामी जोडीने राजस्थानला वादळी सुरुवात करून दिली आणि पॉवरप्लेमध्येच धावसंख्या ६० धावांच्या पुढे नेली. पण सहाव्या षटकात, कर्णधार सॅमसन बरगडीच्या दुखापतीमुळे रिटायर हर्ट झाला. यानंतर लवकरच रियान परागही आऊट होऊन माघारी परतला. जैस्वालने सलग दुसरे अर्धशतक झळकावून संघाला सामन्यात निश्चितच टिकवून ठेवले. पण तो बाद होताच नितीश राणाने हल्ला केला आणि फक्त २८ चेंडूत ५१ धावा केल्या. राणा १८ व्या षटकात बाद झाला आणि तो बाद झाल्यानंतर सामना जिंकवण्याची जबाबदारी शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेलवर आली. दोन्ही संघांनी धावसंख्या जवळ नेली पण मिचेल स्टार्कने शेवटच्या षटकात आवश्यक ९ धावा होऊ दिल्या नाहीत आणि सामना बरोबरीत सुटला.
हेही वाचा – DC vs RR : संजू सॅमसनने केला खास पराक्रम! केएल राहुलला टाकले मागे
स्टब्सने खणखणीत षटकार मारून विजयावर केला शिक्कामोर्तब –
यानंतर, निर्णयासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्यात आला. २०२२ च्या आयपीएल हंगामानंतर पहिल्यांदाच सामना सुपर ओव्हरमध्ये निकाली निघणार होता. सुपर ओव्हरमध्ये राजस्थानने प्रथम फलंदाजी केली. त्यांच्यासाठी, रियान पराग आणि शिमरॉन हेटमायर फलंदाजीला आले. सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजीची जबाबदारी मिचेल स्टार्कने घेतली. राजस्थान संघ पूर्ण ६ चेंडूही खेळू शकला नाही आणि त्यांच्या दोन्ही विकेट धावबाद झाल्या. संघाला फक्त ११ धावा करता आल्या. प्रत्युत्तरादाखल, दिल्लीकडून केएल राहुल आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी फक्त ४ चेंडूत सामना संपवला. शेवटच्या चेंडूवर स्टब्सने खणखणीत षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केला.





