WPL 2024 ( #DCvMI Match 12 ) : रोमहर्षक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा एकतर्फी विजय…

WPL Live Cricket Score, DC vs MI Women’s Premier League 2024 : आज महिला प्रीमियर लीग 2024 चा 12 वा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरुद्धचा हा सामना 29 धावांनी जिंकला. या विजयासह दिल्ली गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.
विजयासाठी 193 धावांचा पाठलाग करताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबईला 20 षटकांत 8 गडी गमावून 163 धावा करता आल्या. दिल्लीविरुद्ध मुंबईचे फलंदाज काही विशेष कामगिरी करू शकले नाही. अमनजोत कौर वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. अमनजोत कौर हिने 27 चेंडूत 42 धावांची खेळी केली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले.
A roaring beginning at home for the @DelhiCapitals 👏👏#DC maintain their 🔝 position on the points table with a 29-run win over #MI 🥳
Live 💻📱https://t.co/NlmvrPq6yj#TATAWPL | #DCvMI pic.twitter.com/vP1zGzzFwt
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 5, 2024
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध 20 षटकांत 4 गडी गमावून 192 धावा केल्या. मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी झंझावाती अर्धशतके झळकावली. कर्णधार आणि सलामीला फलंदाजीला आलेली शेफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी झाली. 31 वर्षीय महिला फलंदाज मेग लॅनिंग हिने 38 चेंडूत 53 धावा केल्या. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. त्याचवेळी भारतीय महिला फलंदाज शेफाली वर्मानं 12 चेंडूत 28 धावा केल्या.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या एलिस कॅप्सीने 19 धावा केल्या. हेली मॅथ्यूजने तिला आपला बळी बनवले. जेमिमाने मुंबईविरुद्ध 33 चेंडूत नाबाद 69 धावा केल्या. या नाबाद खेळीदरम्यान त्याने 209.09 च्या स्ट्राईक रेटने आठ चौकार आणि तीन षटकार मारले. त्याचवेळी मारिजन कॅपला केवळ 11 धावा करता आल्या. जेस जोनासन चार धावा करून नाबाद राहिली. मुंबईकडून गोलंदाजीत शबनिम, सायका, पूजा आणि हेली मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.





