DC vs MI सामन्यात तुफान राडा! मैदानात खेळाडू अन् स्टँडमध्ये भिडले चाहते, VIDEO व्हायरल

DC vs MI Big Fight Between Fans in Match : गेल्या रविवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात अनेक वाद दिसून आले. प्रथम, मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात संघर्ष दिसून आला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. त्याच वेळी, या सामन्याशी संबंधित आणखी एक व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल आहे.
एका महिलेने पुरुषाला केली मारहाण –
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, स्टँडमध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये जोरदार हाणामारी होताना दिसते. व्हिडीओमध्ये एक महिला चाहती पुरूषाच्या गालावर चापट्या मारताना दिसत आहे. या वेळी, त्यांच्या आजूबाजूचे लोक मध्यस्थी करुन त्यांना एकमेकांपासू वेगळे करताना दिसत आहेत.
A fight between fans at the Arun Jaitley stadium last night. pic.twitter.com/UYXmAZbg1c
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 14, 2025
या ४८ सेकंदांच्या क्लिपमध्ये, महिला प्रथम पुरूषाला जोरात चापट मारते. त्यानंतर, स्वतःचा बचाव करण्यासाठी, त्या पुरूषाने महिलेच्या तोंडावर प्रतिवार केला आणि तिला खाली पाडले. यानंतर, एक वृद्ध माणूस आणि मागे उभा असलेला एक तरुण देखील एकमेकांशी वाद घालताना दिसले. मात्र, या वादामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. पण लोक हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
हेही वाचा – DC vs MI : ‘मला फक्त असे वाटत होते की…’, तिलकने ‘रिटायर्ड आऊट’ प्रकरणारवर सोडले मौन
बुमराह आणि करुण यांच्यातही झाला होता वाद –
The average Delhi vs Mumbai debate in comments section 🫣
Don’t miss @ImRo45 ‘s reaction at the end 😁
Watch the LIVE action ➡ https://t.co/QAuja88phU#IPLonJioStar 👉 #DCvMI | LIVE NOW on Star Sports Network & JioHotstar! pic.twitter.com/FPt0XeYaqS
— Star Sports (@StarSportsIndia) April 13, 2025
या सामन्यादरम्यान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फलंदाज करुण नायर यांच्यात वादावादी झाली. या वेळी करुण फलंदाजी करत होता. बुमराहच्या स्पेलवर त्याने डीप स्क्वेअर लेगकडे एक शॉट मारला. त्यानंतर तो धाव घेण्यासाठी धावला पण या दरम्यान तो नॉन-स्ट्रायकर एंडवर उभ्या असलेल्या गोलंदाज जसप्रीत बुमराहला धडकला. परंतु, यानंतर करुणने बुमराहची माफीही मागितली पण तो खूप रागावला होता.





