DC vs KKR : कुलदीपने रिंकूच्या कानशिलात मारल्यानंतर DC आणि KKR चा मोठा खुलासा, पाहा VIDEO

DC vs KKR after Kuldeep Yadav slapped Rinku Singh video viral : दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा १४ धावांनी दारुण पराभव झाला. या पराभवानंतर डीसीच्यी कुलदीप यादवने केकेआरच्या रिंकू सिंगला सलग दोनदा कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते दोन्ही खेळाडूंमध्ये वाद झाल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र, केकेआरने व्हिडीओ शेअर करून याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
केकेआरचा रिंकू आणि कुलदीपमधील वादाबद्दल खुलासा –
Yo kuldeep watch it pic.twitter.com/z2gp4PK3OY
— irate lobster🦞 (@rajadityax) April 29, 2025
दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या आयपीएल २०२५ च्या ४८ व्या सामन्यानंतर, कुलदीप यादव केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंगला कानशिलात मारताना दिसत आहे. यावेळी, रिंकू पहिली चापट मारल्यानंतर थोडा रागावलेला दिसत होता. परंतु, कुलदीप यादव इथेच थांबला नाही, तो दुसऱ्यांदा रिंकू सिंगला चापट मारतानाही दिसला.
Media (𝘴𝘢𝘯𝘴𝘢𝘯𝘪) vs (𝘥𝘰𝘴𝘵𝘰𝘯 𝘬𝘦 𝘣𝘦𝘦𝘤𝘩 𝘬𝘢) Reality!
𝘎𝘦𝘩𝘳𝘪 𝘥𝘰𝘴𝘵𝘪 feat. our talented UP boys 😂 pic.twitter.com/2fY749CSXf
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 30, 2025
या घटनेचा व्हिडीओ पाहून चाहते दोघांमध्ये काही तरी बिनसल्याचा अंदाज लावताना दिसले. मात्र, केकेआरने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघांची मैत्रीपूर्ण बाजू दाखवली आहे. तसेच, व्हिडीओच्या पार्श्वभूमीत ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ हे गाणे वाजत आहे.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi: बिहारच्या नितीश सरकारने वैभव सूर्यवंशीसाठी उघडली तिजोरी, ‘इतके’ लाख देण्याची घोषणा
Only pyaar 🫰🫂 pic.twitter.com/bePBy6Y54E
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 30, 2025
दिल्ली कॅपिटल्सनेही ‘ओन्ली लव्ह’ या कॅप्शनसह असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये कुलदीप यादव आणि रिंकू सिंग मैत्रीपूर्ण आणि हातांनी प्रेमाचे चिन्ह बनवताना दिसत आहेत. तसेच, व्हिडिओमध्ये रिंकू सिंग ‘लव्ह इच अदर…’ असे म्हणत असल्याचे दिसत आहे. उल्लेखनीय म्हणजे रिंकू सिंग आणि कुलदीप यादव रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळतात. जिथे दोघेही बहुतेकदा खोली शेअर करताना दिसतात. दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती.





