Pathum Nissanka Record : पाथुम निस्संकाची ऐतिहासिक कामगिरी; १३ वर्षांनंतर ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच श्रीलंकन खेळाडू
Pathum Nissanka Record : श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मागील १३ वर्षांत ही किमया साधता आली नव्हती.

Pathum Nissanka IPL Record : आयपीएल २०२६ च्या ५१व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर अरुण जेटली स्टेडियमवर आमनेसामने आले होते. ज्यामध्ये केकेआरच्या गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली असली, तरी सलामीवीर पाथुम निस्संकाने आपल्या फटकेबाजीने चाहत्यांची मने जिंकली. केकेआरच्या फिरकीसमोर दिल्लीचा डाव पत्त्यासारखा कोसळत असताना निसंकाने वादळी अर्धशतर झळकावत एका नव्या विक्रमाला गवसनी घातली.
१३ वर्षांनंतर श्रीलंकन फलंदाजाचा धमाका
पाथुम निस्संकाने केवळ २८ चेंडूत अर्धशतक ठोकले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर तो लगेच बाद झाला, मात्र या खेळीसह त्याने आयपीएलमध्ये अशा एका विक्रमाची नोंद केली आहे जो तब्बल १३ वर्षांनंतर पाहायला मिळाला. त्याने केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावताच आयपीएलच्या एका हंगामात दोन वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याचा टप्पा ओलांडला.
Pathum Nissanka and Ashutosh Sharma played crucial innings to help DC reach 142/8 on a pitch that made scoring difficult.
. #DCvsKKR #ipl2026 #DC #KKR pic.twitter.com/sWfH0Exsf9
— Cric 360 Cricket (@Cric360_Cricket) May 8, 2026
श्रीलंकेच्या कोणत्याही फलंदाजाला मागील १३ वर्षांत ही किमया साधता आली नव्हती. यापूर्वी २०१३ मध्ये श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू महेला जयवर्धने याने एकाच हंगामात दोनदा ५० हून अधिक धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, जयवर्धने त्यावेळी दिल्लीच्याच संघाकडून खेळत होता. निस्संकाने याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६२ धावांची शानदार खेळी केली होती.
निस्संकाची कामगिरी आणि दिल्लीची बिकट अवस्था –
Pathum Nissanka — 50 off 29 🔥
5 fours, 3 sixes, SR 172
Watched 4 partners come and go.
Kept finding the rope.
DC 142/8 because he carried this innings alone.Lone warrior knock pic.twitter.com/r3pWBAN491
— Suresh N (@TheDugoutStats) May 8, 2026
पाथुमनिस्संकाला दिल्ली कॅपिटल्सने ४ कोटी रुपयांच्या मोठ्या किमतीत खरेदी केले आहे. या हंगामात त्याने आतापर्यंत १० सामन्यांत २७.८ च्या सरासरीने २७८ धावा केल्या आहेत. जरी त्याची सरासरी सलामीवीर म्हणून कमी वाटत असली, तरी त्याचा १६० चा स्ट्राईक रेट दिल्लीसाठी महत्त्वाचा ठरला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूने त्याला योग्य साथ मिळत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
दिल्लीचा टॉप ऑर्डर फेल, प्लेऑफचे स्वप्न धूसर –
केकेआरविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरला. केएल राहुल (२३), नितीश राणा (८), समीर रिझवी (३) आणि ट्रिस्टन स्टब्स (२) यांना सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती आणि अनुकूल रॉय या फिरकी त्रिकुटासमोर धावा काढताना मोठी कसरत करावी लागली. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४२ धावांपर्यतच मजल मारता आली. त्यामुळे केकेआरला विजयासाठी १४३ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.





