“दाऊद दहशतवादीच, मी विकी गोस्वामीबद्दल बोलत होते” ; ममता कुलकर्णीचा ‘यु-टर्न ‘

Mamta Kulkarni on Dawood। ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी आता आध्यात्मिक गुरु बनली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवरील तिच्या विधानामुळे ती चर्चेत आहे. ममता कुलकर्णीने,”दाऊदने मुंबई बॉम्बस्फोट घडवले नाहीत आणि तो दहशतवादी नाही” असे खळबळजनक विधान केले होते. पण आता तिने या विधानावरून यू-टर्न घेतला आहे.
ममता कुलकर्णीचा यू-टर्न Mamta Kulkarni on Dawood।
गोरखपूरमध्ये माध्यमांशी बोलताना ममता यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या विधानाचा गैरसमज झाला आहे. ती म्हणाली, “मी तिथे दाऊद इब्राहिमबद्दल नाही तर विक्की गोस्वामीबद्दल बोलत होते. दाऊद खरोखरच दहशतवादी होता.” ममता यांनी सांगितले की, ती कधीही दाऊदला भेटली नाही. ती म्हणाली, “सध्या, माझा राजकारणाशी किंवा चित्रपट उद्योगाशी कोणताही संबंध नाही. मी अध्यात्मात पूर्णपणे बुडलेली आहे. मी सनातन धर्माची अनुयायी आहे. कोणत्याही प्रकारच्या राष्ट्रविरोधी घटकाशी संबंध ठेवणे माझ्यासाठी अशक्य आहे.”
ममता कुलकर्णी काय म्हणाली ?
दाऊदबाबतच्या तिच्या वादग्रस्त विधानात ममता म्हणाल्या, “माझा दाऊदशी काहीही संबंध नाही.” तिने कोणाचे तरी नाव घेतले. पण त्याने कधीही देशात बॉम्बस्फोट किंवा देशविरोधी कारवाया केल्या नाहीत. मी त्याच्यासोबत नाही, पण तो दहशतवादी नाही. तुम्हाला फरक समजला पाहिजे. जेव्हा तुम्ही दाऊदचा उल्लेख करता, ज्याच्याशी माझे नाव जोडले जाते, तेव्हा त्याने कधीही मुंबईत बॉम्बस्फोट घडवले नाहीत. मी दाऊदला कधीही भेटले नाही.”असे म्हणत वाद निर्माण केला होता.
वादांनी वेढलेले वैयक्तिक जीवन Mamta Kulkarni on Dawood।
ममता कुलकर्णी एकेकाळी इंडस्ट्रीतील एक मोठी स्टार होती. तिने बाजी, क्रांतीवीर, चायना गेट, सबसे बडा खिलाडी आणि करण अर्जुन सारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. ती तिच्या ग्लॅमरस स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध होती. तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना, ममताने इंडस्ट्री सोडली. तिचे नाव अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आणि ड्रग्ज लॉर्ड विकी गोस्वामीशी जोडले गेले.
ममताचे नाव ड्रग्ज तस्करीत समोर आले. तिने विकीशी लग्न केल्याचे अंदाज होते. विकीसोबतच्या तिच्या संबंधांमुळे ममताचे करिअर उद्ध्वस्त झाले. या नात्यासाठी तिने देश सोडला. जवळजवळ २५ वर्षांनी, ती भारतात परतली आहे आणि निवृत्त झाली आहे. या वर्षीच्या महाकुंभमेळ्यात त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून त्यांच्या नियुक्तीवरून बराच वाद निर्माण झाला होता.





