किन्नर आखाड्याची मोठी कारवाई ; ममता कुलकर्णी अन् लक्ष्मी नारायण यांना महामंडलेश्वर पदावरून हटवले

Kinnar Akhada on Mamta Kulkarni । प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यादरम्यान, किन्नर आखाड्याने एक मोठी कारवाई केली आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी यांना महामंडलेश्वर पदावरून काढून टाकले आहे. त्यासोबतच ममता कुलकर्णीची आखाड्यातूनदेखील हकालपट्टी केली आहे. यासोबतच, लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर आणि आखाड्यातून काढून टाकण्यात आले आहे. किन्नर आखाड्याला लवकरच एक नवीन आचार्य महामंडलेश्वर मिळणार आहे. ऋषी अजय दास म्हणाले की, आखाड्याची नव्याने पुनर्रचना केली जाईल.
माजी अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी काही दिवसांपूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यात निवृत्तीची घोषणा केली होती. महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्यात ममता आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना भेटल्या होत्या. यानंतर, ममताने संगम येथे पिंडदानाचा विधी केला आणि तिचा राज्याभिषेक किन्नर आखाड्यात झाला. महाकुंभात संन्यास घेतल्यानंतर, ममता कुलकर्णी यांना ‘श्री यमाई ममता नंद गिरी’ असे नवीन आध्यात्मिक नाव देण्यात आले. यासोबतच त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले.
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर बनवल्यानंतर वाद Kinnar Akhada on Mamta Kulkarni ।
ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वरपदी नियुक्तीवरून बराच वाद झाला. ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्तीविरुद्ध संत सतत निषेध करत होते. बाबा रामदेव यांनी ममता महामंडलेश्वर करण्याच्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी म्हटले होते की कालपर्यंत सांसारिक सुखांमध्ये रमलेले काही लोक एकाच दिवसात संत झाले आहेत किंवा त्यांना महामंडलेश्वर सारख्या पदव्या मिळाल्या आहेत. किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांनीही एका महिलेला किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवणे हे तत्वांच्या विरुद्ध असल्याचे म्हटले होते.
संन्यास घेतल्यानंतर ममता काय म्हणाल्या? Kinnar Akhada on Mamta Kulkarni ।
एका वृत्तसंस्था दिलेल्या मुलाखतीत ममता कुलकर्णी म्हणाल्या होत्या की, ‘मी भारत सोडण्याचे कारण अध्यात्म होते. १९९६ मध्ये, माझा कल अध्यात्माकडे झाला आणि त्याच काळात माझी भेट गुरु गगनगिरी महाराजांशी झाली. त्यांच्या आगमनानंतर, माझी अध्यात्मात आवड वाढली आणि माझी तपश्चर्या सुरू झाली. तथापि, मला वाटते की बॉलिवूडने मला प्रसिद्धी दिली. मी बॉलिवूड सोडले आणि २००० ते २०१२ पर्यंत तपस्या सुरू ठेवली. मी दुबईत बरीच वर्षे घालवली, जिथे मी दोन बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहत होतो आणि या १२ वर्षात मी ब्रह्मचर्य पाळले. अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान , ममताचा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘कभी तुम कभी हम’ हा २००२ मध्ये आला होता. यानंतर त्याने मनोरंजन जगत सोडले.
हेही वाचा
‘भाजप धोकादायक खेळ खेळत आहे…’; यमुनेच्या पाण्यावरून अरविंद केजरीवाल यांचा मोठा आरोप





